प्रतिक

Submitted by Asu on 7 February, 2020 - 06:45

आज रोझ डे निमित्त-
प्रतिक

प्रेयसीचे प्रतिक खरोखर
गुलाबी गुलाबकळी सुंदर
रंग-रूप बेधुंद सुगंध
करीतसे सर्व जगास गुंग

प्रत्यक्षाहून प्रतिक मोहक
अबोल तरीही संदेश वाहक
प्रेयसी पाठी मरती नाहक
गुलाबकळी परी नसे दाहक

भेद करीना गुलाब कळी
सर्व जनावर प्रेम उधळी
प्रेयसीचे असे प्रेम वेगळे
रुसून फुगून प्रियकरा छळे

प्रेयसीहून नाजूक फुल बरे
कोण साहिल हिचे नखरे
नाचवित तुला स्वतः हसते
गुलाबकळी खिशात बसते

- प्रा.अरूण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults