मला शेमबुड पुसायला बायको पाहिज्ये

Submitted by सिद्धेश्वर विला... on 6 February, 2020 - 07:21

शेंबड्या पोरानं हागुर्डीला

लग्नासाठी विचारलं

मला शेमबुड पुसायला बायको पाहिज्ये

तुझ्यावाणी देखणी

हागुर्डी लाजली अन म्हणाली

मला बी धुवून धुवून कंटाळा आलाय

तूच धुशील का माझी ? बनून माझा धनी

नाक फुरकावत होकार दिला

करून सारा विचार

हागुर्डीनही लगेच उडविला

हवेमध्ये बार

शेम्बड्याची होता पंचाईत

हागुर्डी आधीच व्हती घाईत

काढुनी गळ्यातील ताईत

हागुर्डीच्या गळ्यात बांधला

मनोमन आनंदली हागुर्डी

शेम्बड्याला झाली होती सर्दी

हात पकडला आणि धरून

थेट परसाकडे नेला

शेम्बडा आधी फक्त शेम्बडा होता

आकंठ प्रेमात नहाला

पण हात कायमचा बरबटला

=========================

सिद्धेश्वर विलास पाटणकर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

आनंद शिंदेंना पाठवा. चाल लावून देतील. मग लग्नाच्या वरातीला डीजे.. वर लोकं या गाण्यावर डान्स करतील.

छान लिहिलंत सिद्धेश्वर. नेहमीप्रमाणेच किती घाण..!! Biggrin
पण कला आहे तुमच्याकडे.. एक मुरळी बिना चाल/ताल नाचुन गेलेली दिसते या कवितेवर Wink