घनगर्द तमाच्या ओळी ( विधाता)

Submitted by माउ on 5 February, 2020 - 08:47

घनगर्द तमाच्या ओळी पाण्यावर हलते रात
थकल्या मिटल्या स्वप्नांचे आभास जागती आत

मिणमिणता गाव दिव्यांचा घेऊन थांबला पूल
पावले शांत उमटावी इतकीच तुझी चाहूल

ओल्या वा-यावर येती संदिग्ध कुणाचे सूर
ओंजळीत धरल्या वेळा निथळती पोचती दूर

इच्छांची गुंफून दोरी काठास बांधली नाव
भिजल्या विझल्या स्वप्नांचे वाहून चालले गाव

- रसिका

Group content visibility: 
Use group defaults

खूप खूप सुंदर!
पाण्यावर हलते रात, मिणमिणत्या दिव्यांचा गाव आणि तो पूल, निथळत्या वेळा... आवडले!

वाह!