हार-जीत

Submitted by अरुणकुमार शिंदे on 5 February, 2020 - 07:23

तो म्हणाला तू जिंकलास
मी म्हणालो मी जिंकलो नाही
तू हरलास, कारण
मी शर्यत लावलीच नव्हती.
तुझं तूच ठरवलंस आणि
माझ्याशी शर्यत लावलीस.
मला हरवण्याच्या नादात
तू स्वत:ला फसवलंस.
क्रोधाच्या आगीत होरपळून
मलाच दोषी ठरवून मोकळा झालास.
मी कोण हरवणार तूला
झाले गेले विसरून जा.
गंगेचे पाण्यावानी हे जीवन
नसे पाप पुण्याची मोजणी.
मनी नसो तूझ्या कदापि टोचणी
भले करो तूझं प्रार्थितो देवाचरणी.
ना मी जिंकलो ना तू हरला
वेड्या असा विचार मनी का केला.

Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिली आहे.
गंगेचे पाण्यावानी हे जीवन
नसे पाप पुण्याची मोजणी.
मनी नसो तूझ्या कदापि टोचणी
भले करो तूझं प्रार्थितो देवाचरणी.+१११११