अ-बोली

Submitted by shrishrikant on 21 April, 2009 - 05:16

पानांचा सळसळाट
तुझ्या वाटेत-
-वाळलेल्या.

आयुष्याच्या निबंधात
काही जागा-
-गाळलेल्या.

काही अ-बोलीच्या वेण्या
तुझ्या-माझ्या मनात-
-माळलेल्या.

अनाठायी शपथा
वेड्यागत उगाच-
-पाळलेल्या.

रेशीमगाठी
पडण्याआधीच
टाळलेल्या.

नि:शब्दाच्या ओळी
अर्थावर
भाळ्लेल्या.

वाटेवर उभा
फुलांच्या-
-जाळलेल्या.

गुलमोहर: 

आयुष्याच्या निबंधात
काही जागा-
-गाळलेल्या.

हे आवडले.

मस्त !

रेशीमगाठी
पडण्याआधीच
टाळलेल्या.

येथे
रेशीमगाठी पडण्याआधीच
परस्पर- (किंवा इतर समर्पक शब्द)
टाळलेल्या

असे असावेसे वाटते.
कविता छानच आहे.
-सविनय.
..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..

छान आहे!!!!
....मानसी

अतिशय छान............!

सुहास शिन्दे

अतिशय छान............!

सुहास शिन्दे

अशा दुरुस्त्या सुचवायला मला खरं म्हणजे आवडत नाही, तरी पण,
रेशीमगाठी
पडण्याआधीच
सुटलेल्या ... कसे वाटते?
कविता छानच आहे!
बापू करन्दिकर

अल्का आणि बापू,
तुम्ही सुचवलेला फेरबदल शब्द आणि कवितेच्या रचनेस उपयुक्त आहे.
पण त्याने कडव्याचा आशयच मुळातुन बदलेल. तो बदल नकोच!

प्रशंसेबद्दल धन्यवाद मंडळी.