बॅले डान्स, रोहित पक्ष्यांचा

Submitted by Dr Raju Kasambe on 4 February, 2020 - 01:19

बॅले डान्स, रोहित पक्ष्यांचा

हजारो अग्निपंखांचे थवे गुलाबी
खाडीत कांदळवनाच्या उतरती
लावे वेध मिलनाचे, चाहूल मृगाची
ठेका धरतो ‘फ्लॅश मॉब’ नृत्याचा
बॅले डान्स, रोहित पक्ष्यांचा !

लिपस्टिक आयशाडो
मिनिस्कर्ट स्टॉकिंग्ज
तयारी गुलाबी गुलाबी
करून मेकअप पूर्ण पार्टीचा
बॅले डान्स, रोहित पक्ष्यांचा !

कॅटवॉक गुलाबी सुंदरींचा
नटून, खेटून चाले तुरुतुरु
जणू परेड नृत्यांगणांची
आभास नुसता खाण्याचा
बॅले डान्स, रोहित पक्ष्यांचा !

वॉकिंग, जॉगिंग, फ्लाइंग
व्यायाम सदा वाकण्याचा
झीरो फिगर टिकविण्या
आहार नुसता कवकांचा
बॅले डान्स, रोहित पक्ष्यांचा !

कधी डावीकडे, कधी उजवीकडे
झटक्यात मान मधूनच मोडे
मारीत गुलाबी फ्लॅश पंखांचा
खेळ रंगतो अनुनयनृत्याचा
बॅले डान्स, रोहित पक्ष्यांचा !

डॉ. राजू कसंबे
Dt. 26 May 2019.

1920px-Lesser_Flamingo_Phoeniconaias_minor_Courtship_Dance_by_Dr._Raju_Kasambe_DSCN0567_(10).jpg

Link of the video posted on YouTubeLink of the video posted on YouTube
https://www.youtube.com/watch?v=nGjQu6nmhSw

Group content visibility: 
Use group defaults