सनकी भाग ११

Submitted by Swamini Chougule on 3 February, 2020 - 04:13

असेच दिवस चालले होते. प्रोजेक्टचे काम आता संपले होते. आता लगबग होती ती फॅशन इव्हेंट ऑर्गनाईझ करण्याची. त्यासाठी काया,शिवीन,सुधीर व रिचा झटत होते. जी काया आज पर्यंत कोणत्याही फॅशन इव्हेंटला हजर नसे पुरस्कार मिळाला तरी तिच्या तर्फे तो पुरस्कार सुधीर स्वीकारत असे; शो टॉपर बरोबर देखील सुधीर रॅम्पवर चालत असे. तिला जणू माणसांची व गर्दीची ऍलर्जी होती. पण तिच काया आज या फॅशन इव्हेंटसाठी हिरीरीने काम करत होती.ती सगळी छोटी-मोठी कामे स्वतः करवून घेत होती.याच आश्चर्य तिच्या स्टापला वाटत होतं. सुधीरला मात्र या गोष्टीची खात्री होती की कायाच्या डोक्यात काही तरी घातक शिजत आहे.कारण शिवीन आणि रिचाची जवळीक पाहून ही काया कमालीची शांत होती.पण ही वादळ पूर्वीची शांतता होती हे मात्र निश्चित.
शिवीन आणि रिचा एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडाले होते पण प्रेमाची कबुली दोघे ही देत नव्हते. रिचाला असं वाटत होतं की शिवीनने पुढाकार घ्यावा. शिवीन मात्र रिचा समोर त्याच्या प्रेमाची कबुली देण्यासाठी एक सरप्राईज प्लॅन करत होता.ज्याची रिचाला पुसटशी कल्पना ही नव्हती.
शिवीनने रिचाला फॅशन इव्हेंट झाल्यावर त्याच रात्री खूपच रोमँटिक डेटवर घेऊन जाऊन तिला प्रपोज करून लग्नासाठी मागणी घालायची व लवकरात लवकर धुमधडाक्यात लग्न करायचं असे ठरवलं होते. त्यांची एंगेजमेंट तर झालीच होती. पण त्याने तिला रीतसर प्रपोज केले नव्हते. म्हणून शिवीन डेटच्या जय्यत तयारीत होता. त्याला फॅशन इव्हेंटच्या कामाचा लोड ही होताच पण तो स्वभावाने रोमँटिक होता.
इकडे रिचा मात्र फॅशन इव्हेंटच्या तयारी बरोबरच काया नावाचे कोडे सोडवण्यात व्यग्र होती. ती न चुकता एक तरी फोन एस.एस म्हणजे तिने अपॉइंट केलेल्या प्रायव्हेट डिटेक्टिव्हला करत असे. एस.एस ने रिचाला आज कायाची माहिती देण्यासाठी एका कॅफे मध्ये बोलावले होते. ती आज लवकरच ऑफिस मधून निघाली. तिने कायाला ती जात आहे अशी सूचना दिली होती. पण शिवीन तिची वाट पाहिल म्हणून ती शिवीनला सांगायला गेली.
रिचा, “ शिवीन तू आज एकटाच घरी जा मी माझं काम करून जाईन;माझी मी घरी” रिचा म्हणाली
शिवीन,“ का? अस काय काम आहे तुझ? अस ही ऑफिस सुटायला अजून दोन तास आहेत फक्त, माझं काम ही होत आलय जाऊ या बरोबर”तो मनगटी घड्याळात पाहत म्हणाला.
रिचा,“ आहे जरा काम माझं तू तुझं काम कर मी जाईन घरी माझं काम करून.”ती डोळे मिचकावत म्हणाली.
शिवीन,“ अच्छा म्हणजे मी आज एकटाच! तुझी ती जुन्या काळातील शांत गाणी नाही ऐकावी लागणार मला ड्रायव्हिंग करताना; थँक्स गॉड!” तिला चिडवण्याच्या सुरात तो म्हणाला.
रिचा,“ हो का? जा हा तू आज ती तसली पॉप गाणी ऐकत पण लक्षात ठेव ही सूट फक्त आज आहे.”अस ती शिवीनचा कान पिळत म्हणाली.
शिवीन, “ सोड सोड माझा कान दुखतोय जंगली कुठली! .” तो कान सोडवून घेत म्हणाला.
रिचा,“नीट जा आणि रॅश ड्राईव्ह करू नकोस नाही तर तुला सवय आहे गाडी हवेच्या वेगाने चालवायची जसे की कार नाही तर प्लेन आहे.”ती त्याला तंबी देत म्हणाली.
शिवीन, “ हात जोडतो, हो माझी आई जा आता तू जाणार नाहीस का? नाही तर बस इथेच.”तो हसत म्हणाला.
रिचा,“ आई नाही मी; वाङदत्त वधू आहे तुझी ok by” ती असं म्हणून निघाली पण शिवीन तिला थांबवून.
शिवीन,“ एक मिनिट कसली दत्त?”तो डोकं खाजवत म्हणाला.
रिचा,“ वाङदत्त रे वेड्या म्हणजे होणारी बायको!” तिने त्याच्या डोक्यावर टपली मारली आणि म्हणाली.
शिवीन,“ ओ! that is that! Ok by.”
रिचा,“ yes my dear तेच ते! Ok by असं म्हणून ती गेली
पण शिवीन खूप वेळ हसत तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होता.
इकडे काया मात्र त्या दोघांचे संभाषण ऐकत व पाहत होती.तिला राहून राहून रिचाचा राग येत होता.ती शिवीनवर हक्क गाजवत होती हेच कायाला आवडत नव्हते पण तिने तो राग व्यक्त केला नाही.सुधीर ही हे सगळं पाहत होता व कायाचे रियाक्ट न होणे त्याला खटकत होते. त्याला आता कायाच्या शांत राहण्याची भीती वाटत होती कारण कायाच्या डोक्यात घातक असे काही तरी शिजतयं याची त्याला खात्री होती पण नेमके काय? याचा त्याला अंदाज लागत नव्हता. काया ज्वालामुखी सारखी आतून धुमसत होती व हा ज्वालामुखी केव्हा व कोणावर फुटणार हे मात्र सुधीरला कळत नव्हते.
रिचा जरा उशीराच कॅफेमध्ये पोहचली तर एस.एस. आधीच तिथे हजर होता.
रिचा,“सॉरी एस .एस. मला जरा उशीरच झाला पोहचायला.” ती असे म्हणाली व वेटरला बोलवणार तोच एस.एस. बोलू लागला.
एस.एस,“ its ok ;त्याची काही गरज नाही मी दोन हॉट कॉफीची ओर्डर दिली आहे” त्याचे बोलणे पूर्ण होते तो पर्यंत वेटर कॉफी घेऊन आला. दोघांनी ही कॉफीचे मग उचलले व रिचा बोलू लागली.
रिचा,“काय माहिती मिळाली काया बद्दल एस.एस तुम्हाला.” ती कॉफी पित बोलली.
एस.एस,“हो बरीच शॉकिंग माहिती मिळाली आहे काया जयसिंग बद्दल!”तो शांतपणे म्हणाला व एक फाईल रिचा समोर ठेवली.
रिचा,“ शॉकिंग? ”तिने आश्चर्याने विचारले.
एस.एस,“हो मिस सरनाईक , काया मुंबईच्या जी.के.जी . फॅशन इन्स्टिट्यूट मध्ये शिकली आहे. ती ही 2005 मध्येच तुमच्या व शिवीनच्या बरोबर डिग्री घेऊन बाहेर पडली आहे.” ते माहिती देत होते.
रिचा, “काय? काया आमची बॅचमेट आहे. पण माझ्या हे लक्षात कसे आले नाही?”ती आश्चर्याने म्हणाली.
एस.एस,“ कसे लक्षात येणार किंवा ओळखणार तिला! look at this photos.” असे म्हणून त्याने फाईल मधील काही सामूहिक फोटो रिचाच्या पुढ्यात ठेवले. त्यातील एका मुलीच्या चेहर्‍याला लाल पेनने वर्तुळ काढला होता.रिचा फोटो हातात घेऊन पाहू लागली.
तो फोटो एका काळ्या सावळ्या, पचपचीत तेल लावून घट्ट वेणी व साधारण सलवार-कमीज घातलेल्या मुलीचा होता. त्याच फोटोत शिवीन आणि रिचा ही होते. तो त्यांच्या कॉलेजच्या सॅन्डऑफ पार्टीचा ग्रुप फोटो होता.
एस.एस,“ कशी ओळखायला येणार मिस सरनाईक तुम्हाला काया जयसिंग कारण आजची आणि 2005 मधील काया खूप वेगळी दिसते.”त्याने आत्ताचा कायाचा फोटो तिच्या समोर ठेवला.look at the difference between than and now. She is completely change.”
रिचा दोन्ही फोटोंचे निरीक्षण करून काही तरी आठवल्याच्या अविर्भावात बोलली.
रिचा,“ हो आठवले मला ती खूपच अजागळ राहत होती म्हणून आमच्या बरोबरची बरीच मुले तिला चिडवत पण जेंव्हा फर्स्ट इअर मध्ये तिने टॉप केले तेंव्हा पासून सगळं बंद झाले.मी तिला ओळखलेच नाही कारण एक तर तिच्यात झालेला चेंज आणि खूप वर्षे झाली. आणि ती आमच्या ग्रुप मध्ये कधीच नव्हती.”रिचा बोलली.
एस.एस, “ डिग्री पूर्ण झाल्यावर काया जयसिंग गायब झाली. ती कुठे होती? तब्बल पाच वर्षे काय करत होती? हे मात्र कोणालाच माहीत नाही. तिला दोन कॉलेज मैत्रिणी होत्या. त्यातली एक कायमची अमेरिकेला गेली. पण ती कुठे राहते काय करते? हे मात्र माहीत नाही. मी शोधतोय तिला आणि दुसरी कुठे आहे ते मात्र माहीत नाही. पाहू कुठे सापडते का ते! त्यांच्या कडून आपल्याला काया बद्दल बरीच महत्त्वाची माहिती मिळू शकेल.बऱ्याच वेळेस कुटुंबापेक्षा मित्र मैत्रिणींना आपल्या बद्दल बरीच माहिती असते.”
रिचा,“हो ना आपण जे घरी सांगू शकत नाही ते मित्र-मैत्रिणींना सांगत असतो.पण कायाच्या विक्षिप्त स्वभावामुळे तिला म्हणावे तसे जवळचे मित्र-मैत्रिण नसतील असा माझा अंदाज आहे.”
एस.एस, “ आता अमेरिकेमध्ये असणारी मुलगी कायाची बेस्ट फ्रेंड होती म्हणे.बरं शिवीन आणि तिच काही अफेर वगैरे होत का?”त्याने संशयाने विचारले.
रिचा,“ असं का विचारताय तुम्हीं? शिवीनची बरीच अफेर्स होती पण त्याच्या सगळ्या गर्लफ्रेंड मला माहित आहेत.कारण मी त्याची लहानपणा पासून बेस्टफ्रेंड आहे.कुटुंब आणि मित्रांचा जो नियम कायाला लागू होतो तोच शिवीनला होत नाही का?त्याच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट मला माहित आहे. कायाला तो कॉलेजमध्ये कधी समोरा-समोर भेटला ही नाही मग अफेर वगैरे तर खूप लांब पण तुम्ही अस का विचारताय? तिने जरा रागानेच विचारले.
एस.एस,“प्लीज शांत व्हा मिस सरदेसाई. हे विचारण्यामागे खूप मोठे कारण आहे.तुमचा अपघात अपघात नव्हताच मुळी; तुमचा संशय बरोबर होता.तो एक घातपात होता.तो ही कायाने घडवून आणलेला. पक्या नावाचा एक गुंड आहे त्याला तुमच्या हाफ मर्डरची सुपारी सुधीर करवी कायाने दिली होती.अशी माझ्या सोर्सेस कडून मला पक्की माहिती मिळाली. म्हणून मी शिवीन व कायाच्या अफेर बद्दल विचारले.”
रिचा, “म्हणजे माझा संशय खरा होता तर! पण काया माझ्याशी अशी का वागतीय?”रिचाला हा प्रश्न आता सतावू लागला होता.
रिचा खरं बोलत आहे की काया आणि काया इतकी शांत का होती? तिच्या डोक्यात नेमकं काय शिजत होत?
क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

@नौटंकी
@Cuty
खूप खूप धन्यवाद
@मन्या s
धन्यवाद,पुढच्या भागात शुद्ध लेखन सुधारण्याचा प्रयत्न करेन

स्वामिनी,
गमभन किंवा मनोगत या साईटवर खूप चांगला शुद्धीचिकित्सक आहे मराठी साठी.(अर्थात लेख तिथेही प्रकाशित करावा लागेल ) नुसतं ऱ्हस्व दीर्घ नाही तर शब्दांसाठी सुचवणी पण(ही जाहिरात वगैरे नाही, मला पूर्वी खूप उपयोग झाला आहे याचा मराठी लिहिताना.आता निम्मे काम मोबाईलवर गुगल इंडिक ने होतेच.)
कथा वाचते आहे.भाग लवकर संपतात.मला काया चं पात्र वाचताना ऐतराज मधली प्रियांका चोप्रा आठवते.

@anu
धन्यवाद, मी तुम्ही सांगितलेल्या साईड नक्की पाहिन,प्रथम दर्शनी काया ही ऐतराज मधील प्रियांकाच्या जवळपास जाणारी वाटणे साहजिक आहे पण आत्ताच अंदाज नको क्योंकि कहानी अभी बाकी हैं मेरे दोस्त!
Wink