वीनि आनआनि स्वीति च्या गमति

Submitted by अश्विनीमामी on 21 April, 2009 - 05:01

वीनि आनि स्वीति माझ्या दोन कुत्र्यान्चि नावे आहेत. दोघि माइलेकि. आनि घरि मी आनि माझि मुल्गी अस्तो.
दोन वर्शान पूर्वि माझा नव्रा ह्रुदयविकारच्या झत्क्यानि अचानक गेला. मी अजुन तो धक्का नीत पचवू शक्लेली
नाही. तो जान्या आधि दोनच महिने आम्हि वीनि ला आन्ले बन्गलूर वरून. लाम्ब लचक काले कुत्रे. पन आम्हि
तिच्या मुले दुक्खतून सावर्लो. वीनि चि मुल्गि स्वीति. तशिच. कालि आनि लाम्ब. वीनि आता मोथि बाइ सार्खी गम्भीर अस्ते. तर स्वीति अजुन खोद्कर आहे. त्या दोघि रोज सकालि आनि सन्ध्याकलि फिराइला जातत.

दोघिना आवदनारि गोश्त म्हन्जे इतर कुत्राइन्आ पाथ्लाग करून पलवून लाव्ने. जोरात पल्ने आनि मग घरि येवून मस्त झोपने. घरातिल गाद्या, उश्या आनि चाद्रिन्चि वात लावतात. चप्पल बूत तोदुन ताकतत. आनि अबोल राहुन पन खूप बोल्तात. स्वीति ला बार्बी बाहुलि चावने फार आव्दते. वीनि ला शान्तता अवदते. दोघिना अन्घोलिचि भीति वात्ते.

त्या दोघिन मुले आम्चे घरी प्रेम तिकून आहे. एक सम्पूर्न कुतुम्ब असल्या सार्खेच वात्ते. मी घरी काम करत असले तरि दोघि कोम्पुतर च्या जवल बसून राह्तात आनि रात्रि बेरात्रि पन सोबत कर्तात. तुम्च्या पैकी कोनाला कुत्रे
आवद्तात. का? सान्गा ना.

गुलमोहर: 

ही ही Happy रश्मी, मला वाटले तू असल्याच कुठल्यातरी बाफचा दुवा दिला आहेस. पण निघाल भलतच !

अश्विनी, इथे जाऊन देवनागरीत कसं लिहायचं ते बघून घ्या. तसंच लिखाण करुन पूर्ण झालं की प्रतिसाद तपासा मध्ये जाऊन तुम्हांला शुद्धलेखनाच्या चुकाही सुधारता येतील.
http://www.maayboli.com/node/1554

मी तर सगळे न अडखळता वाचले ! तुमच्या दु:खात सहभागी आहे.
सही आहेत विनी आणि स्विटी माझ्या हिश्याचे पण प्रेम द्या त्यांना(Love of my share) !

वरचा दुवा ही वाचा आणि माबोवर येत रहा! Happy

अश्विनीमामी, येत रहा इथे. एखाद्या मोठ्या मानसिक आघातात आपलं मन कुठेतरी आधार शोधतं, गुंतुन रहाण्याचा प्रयत्नं करतं.
आजूबाजूची अनेक माणसं, त्यांच्या धकाधकीच्या आयुष्यात हे समजून घेतातच असं नाही. माझा अनुभव असा आहे की, प्राण्यांनी जरी "हे सगळं" कळत नसलं तरी, आपल्या धन्याला/धनिणीला आपली किती आणि कशी गरज आहे, ते बरोबर ओळखतात, ते. विशेषतः कुत्रे.

इथे मीनाताईंनी त्यांच्या वानूबद्दल अतिशय सुरेख लेखमाला लिहिली होती. तुम्हाला खरच आवडेल वाचायला. इथे पहिल्या लेखाची लिन्क देतेय. प्रत्येक लेखाच्या शेवटी, पुढच्या भागाची लिन्क आहे.
http://www.maayboli.com/node/1840

मामी,
सगळे वाचले......चांगले आहे.
वरती दिलेल्या दुव्यावर जावून थोडा सराव केलात की एकदम फक्कड लिहू लागाल.......