तुम्हा वंदितो सैनिका

Submitted by वैशाली अ वर्तक on 28 January, 2020 - 14:03

सोमवार, १९ ऑगस्ट, २०१९
तुम्हा वंदितो सैनिका

तुम्हा वंदितो सैनिका
अती वृष्टी होता पावसाची
जमले पाणीच पाणी सारीकडे
पुरग्रस्तांचे जीव वाचविण्या
धाव घेतली लगेच सैनिका कडे

होता कुठे दंगाग्रस्त जीवन
येतात मदतीस सैनिक तत्पर
सहूनी कष्ट ,शांत परिस्थिती राखण्या
हाक देता तुम्ही च येता सत्वर

येता कुठली नैसर्गिक आपत्ती
मदतीला सर्वा आधी तुम्ही हो सैनिक
सहज उदार होता स्व-जीवावर
मदत तुमची मागणे , झाले दैनिक.

किती गावे तव कर्तृत्वाचे गोडवे
सर्व जाणिती तुमच्या त्यागाचे मोल
तुजला मानाचा सलाम सैनिका
जीणे तुमचे राष्ट्रासाठी अनमोल

सीमेवर सदैव देश रक्षणात दक्ष
बलिदान करुनी ,अमुचे प्राण रक्षिता
शतदा "तुम्हा वंदितो सैनिका"
तुमच्याच हाती आमुची सुरक्षितता

वैशाली वर्तक

Group content visibility: 
Use group defaults