गणेश वंदना

Submitted by वैशाली अ वर्तक on 28 January, 2020 - 14:00

गणेश वंदना

विनायक तूची । असशी ज्ञानाचा ।
सकल जनांचा । ज्ञानदाता ।।

देवांचा ही देव । विश्वाचा पालक ।
कलेचा जनक । तुची देवा ।।
प्रथम पूजेचा । असे तुज मान ।
करिती सन्मान । सदाकाळ ।।

घेता तव नाम । दुःख निवारण ।
आनंदी जीवन । होत असे ।।
गणराया तुची । आधार विश्वाचा ।
सा-याच जगाचा । तुची एक ।।

रणांगणावर । तु ही धुरंधर ।
दुष्टांचा संहार । करण्यास ।।
करी कृपा आता । आम्हासी रक्षावे ।
दुःख हे हरावे । सकळांचे ।।

तुला विध्नेश्वरा । आले मी शरण ।
करिते नमन । रात्रंदिन ।।
करी कृपा आता । आम्हासी रक्षावे ।
दुःख हे हरावे । सकळांचे ।।

वैशाली वर्तक

Group content visibility: 
Use group defaults