साप पकडायला गेलो माळरानावर

Submitted by बोकलत on 26 January, 2020 - 05:40

मी साप पकडायला गेलो माळरानावर
जेवण वाढा मला केळीच्या पानावर

साप झोपला होता बिळात आत
पानात का नाही वाढला वरण भात

मला पाहताच साप आला बाहेर
लग्नाला न विसरता घेऊन जा आहेर

साप म्हणाला कसा आहेस मित्रा
शर्यतीत का बरं हारला ससा भित्रा

मी साप न पकडता फिरलो माघारी
अटकेपार झेंडा रोवून आले राघो भरारी

साप पकडणं आहे मोठं पझल
सांगा मायबोलीकरांनो कशी आहे गझल

Group content visibility: 
Use group defaults

एकंदरीत तुम्ही आता केवळ भुतांनाच नाही तर माबोकरांपासून शनिदेवापर्यंत सगळ्यांनाच साडेसाती लावणार असे दिसत आहे. Proud

मला गझल क्षेत्रात खूप मोठं नाव कमवायचं आहे. एक दिवस मी खूप मोठा गझलकार होणार. मिर्झा गालिब काहीच नसेल माझ्यासमोर.

सांगा मायबोलीकरांनो कशी आहे गझल
>>>>

नो उर्दू भाषेचा गोडवा नो गझल... !!

कविता म्हणून छान वाटले, चाल लावून गाऊ शकतो, यम्क वगैरे व्यवस्थित जमलेय Happy

Chhan ahe.

>>>>मी साप पकडायला गेलो माळरानावर
जेवण वाढा मला केळीच्या पानावर>>>> साप खाल्ल्यानेच चायनात ती रोगाची साथ पसरलीये ज्यात ५० जण मेलेत. आता इथे आमचंही धाबं दणाणलय. आनि बोकलत तुम्ही म्हणताय, साप पकडून आणतो मग गरमगरमच वाढा Proud

एकंदरीत तुम्ही आता केवळ भुतांनाच नाही तर माबोकरांपासून शनिदेवापर्यंत सगळ्यांनाच साडेसाती लावणार असे दिसत आहे.>>>>> Rofl

गझल दिसायला जरी साधी असली तरी त्यात एक गहन अर्थ लपलाय.>>>>> कळला बरं तो अर्थ. Proud

खुपच अपेक्षा आहेत ब्वा तुमच्या स्वतःकडुन.. Lol>>>> Proud
बाकी अमानवीय धाग्याला विळखा घालायचा सोडून तुम्ही साप पकडायला कशाला जाताय. आधी त्या भुतांच काय ते बघा.

सगळ्यांचे आभार. तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट मिसलीत त्याचा खेद वाटतोय. मी साप पकडायला गेलो होतो तो काही साधासुधा साप न्हवता. तो एक इच्छाधारी साप होता. साप माझ्याशी बोलला यावरून तुमच्या लक्षात यायला हवं होतं. असो.

भारीच एकदम !!
तो एक इच्छाधारी साप होता. साप माझ्याशी बोलला यावरून तुमच्या लक्षात यायला हवं होतं>>> असं आहे होय ते .. मला वाटलं तुम्हाला Parseltongue वाली भाषा येते सापाची ..

छान आहे.
गझले पेक्षा बालकविता जास्त वाटतेय.

भुतं सोडुन कुठं सापांच्या मागे फिरता राव. सर्पमित्रांना समजलं तर तुम्हालाच पोत्यात घालुन पकडून नेतील. Proud

मी साप पकडायला गेलो माळरानावर
जेवण वाढा मला केळीच्या पानावर

छान...! आपणास प्रसिद्ध गझलकार होण्यासाठी शुभेच्छा आहेतच.

०दिलीप बिरुटे

मला वाटते की येथे साप पकडणे आणि जेवण या दोन गोष्टींचा दृष्टांत देऊन गझलकाराने एक विदारक आणि भीषण सत्य वाचकांसमोर मांडले आहे. मानव अंत:प्रेरणेने निसर्गातील वस्तू ओरबाडायला जातो. माणसाची भूक ही शारीरिक गरज ह्या अंत:प्रेरणेला समांतर चालते. ह्या भूक शमावण्याच्या निरनिराळ्या उपायांनंतर त्याला कळून चुकते की जगापुढे धावत राहण्याची स्पर्धा त्याला कुठेच घेऊन जाणार नाही, त्याचा अंती पराभव निश्चित आहे. भविष्यात निसर्ग ओरबडण्याचा विचार माणूस त्यागून देईल असा दुर्दम्य आशावाद गझलकार व्यक्त करताना म्हणतो की तो साप न पकडताच माघारी फिरला. परंतु ह्या सर्व परस्परविरोधी इच्छा/मागणी/पुरवठा/निसर्गवाद गोष्टींमध्ये हे साधायचे कसे, हे मोठे कोडेच आहे, असा खडा सवाल तो शेवटी फक्त मायबोलीकरांसमोर नाही तर संपूर्ण मानवजातीसमोर ठेवतो.