तुझ्याच सारखा मी होणार आहे

Submitted by दत्तप्रसन्न on 16 January, 2020 - 13:37

आठवण आली कितीही खरी
ओघळतील गालावर अश्रू जरी
हृदयी धरुनी पाऊले तुझी
जीवन नव्याने मी जगणार आहे

अडखळेन वाट चुकेन कधी
पडेन ठेच लागूनि जरी
चित्ती प्रार्थुनी मूर्ती तुझी
उठूनी उभा मी सावरणार आहे

गडद छाया दाटेल अनामी
वाटेल मना उदास जरी
अंतरी स्मरोनी हाक तुझी
हसत सदा मी राहणार आहे

पडतील प्रश्न गहन भारी
होईन थोडा सैरभैर जरी
शिकवण आठवोनि तुझी
मार्ग योग्य मी चालणार आहे

बोलण्यास होता अधीर क्षणभरी
व्याकुळ झालो पाहण्या जरी
माझ्यातल्या तुला जाणोनि
तुझ्याच सारखा मी होणार आहे, आई तुझ्याच सारखा मी होणार आहे...

Group content visibility: 
Use group defaults