“मैत्री – कायद्याशी”

Submitted by हर्पेन on 16 January, 2020 - 04:14

“मैत्री” ही नागरिकांची स्वयंस्फूर्त संस्था आहे. देणगीदारांकडून पैसा उभा करून आणि प्रत्यक्ष सहभागातून “मैत्री”चे अनेक उपक्रम चालू असतात. त्यातला एक “मेळघाट मित्र” कुपोषणाच्या विरोधातील उपक्रम आहे.

“मैत्री” च्या आणखी एका उपक्रमाची सुरुवात यावर्षीपासून होत आहे.

कायदा हा आपला मित्र आहे. कायदे आपल्यासाठीच केले आहेत. परंतु त्याबाबतीत आपल्याला फार वरवरचं माहीत असतं. एक नागरिक म्हणून मला कुठले कायदे माहीत हवेत आणि त्याचा उपयोग मी कसा करून घ्यावा ह्यासाठी “मैत्री - कायद्याशी” हा उपक्रम सुरू करत आहोत. कायदा समजून घेऊन सुव्यवस्थेसाठी त्याचा कसा उपयोग करून घ्यावा ह्याची चर्चा आपण करणार आहोत.

कायदा हा केवळ कुणाची तरी अडवणूक करण्यासाठी नसतो. तर अधिक चांगली व्यवस्था असावी आणि सर्वांना न्याय मिळावा अशी त्यामागची कल्पना असते. परंतु त्याविषयी माहितीच नसते म्हणून गडबड होते. ह्या उपक्रमात आपण ग्राहक संरक्षण कायदा, पर्यावरणाचे विविध कायदे, राज्यघटना, महानगरपालिका कायदे पहाणार आहोत. हक्कांबरोबरच कायदा म्हणून आपली काय जबाबदारी आहे ते पहाणार आहोत.

ह्यातील पहिले पुष्प संजय शिरोडकर गुंफणार आहेत. विषय आहे : माहितीचा अधिकार, पर्यावरण आणि नागरिक. हा कायदा काय आहे, एक नागरिक म्हणून मी ह्याचा कसा उपयोग करून घ्यावा ह्याची चर्चा ह्यात केली जाणार आहे. आधी थोडी मांडणी आणि नंतर प्रश्नोत्तरं असं एकूण स्वरूप असेल. हे झालं की आपण थेट ह्या कायद्याचा उपयोग करू शकलो पाहिजे अशी अपेक्षा आहे.

अवश्य या. २६ जानेवारी २०२०. सायंकाळी ०६:१५ ते ७:४५.
स्थळ : इंद्रधनु सभागृह, म्हात्रे पुलाजवळ.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान उपक्रम... शुभेच्छा...
कायदा गाढव असतो. कायदा आंधळा असतो. Justice delayed is justice denied. शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. कायद्याच्या लढाया गरिबांना नागवतात. हे आणि असे विचार अजूनही डोक्यात थैमान घालतात. पण कधीकधी कायद्याचे चांगले स्वरुपही दिसते आणि पटतं Judiciary लोकशाहीचा बलशाली स्तंभ आहे.

ग्राहक संरक्षक कायद्यात Cybercrime पासून संरक्षण बॅंका आणि इतर संस्था किती गांभीर्याने घेतात ?