मी आणि पुस्तके - २०२०

Submitted by अज्ञातवासी on 16 January, 2020 - 03:32

दोन तीन महिन्यापूर्वी मी नारायण धारपांच्या पुस्तकाविषयी धागा काढला होता.
आता २०२० मध्ये वाचलेल्या पुस्तकांविषयी लिहण्यासाठी हा धागा...
(जर नारायण धारपांच्या पुस्तकाविषयी माहिती त्याच धाग्याच्या दुसऱ्या पार्ट मध्ये येईल!)
आणि शक्यतोवर मराठीच पुस्तके असतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'जिहाद' हे हुसेन जमादार यांनी लिहिलेलं पुस्तक पूर्ण वाचलं. खरं सांगायला गेलं तर अशा पुस्तकांमध्ये मला अजिबात रस नसतो.
हुसेन जमादार यांची आत्मकथा असं जिहादच वर्णन करता येईल. त्यांचं बालपण, मुस्लिम सत्यशोधक मंडळ, हमीद दलवाई यांच्याबरोबरीने केलेलं काम, तलाक मुक्ती मोर्चा, अशा अनेक घटना यात येतात.
मुस्लिम समाजातील अनेक चालीरीती आणि अनिष्ट परंपरा या पुस्तकातून कळल्या.

नॉट विदाउट.... मी देखील वाचलं आहे. खूप दिवस मनावर परिणाम करणारे पुस्तक आहे हे. तितकाच सुटकेचा भाग रोमांचक आहे.

@ आदू - नॉट विदाऊट माय डॉटर हे बरंच गाजलेलं पुस्तक आहे, पण कधी वाचावेसे वाटले नाही Happy
थँक्स फॉर अपडेटिंग.

मी वाचलेलं पुढील पुस्तक म्हणजे तुंबाडचे खोत. जबरदस्त आहे. कोकणचे वातावरण, पिढ्यानपिढ्या चाललेला संघर्ष, बेरकी कोकणी माणसे यांचं जबर चित्रण आहे.

- नॉट विदाऊट माय डॉटर हे बरंच गाजलेलं पुस्तक आहे, पण कधी वाचावेसे वाटले नाही >>> मी ही बरेच दिवस वाचायचे टाळत होते.
एकदा नेटाने वाचायला घेतले. सुरुवातीचा बराचसा भाग , बेटीचे विचार , वागणं पूर्वग्रहदूषित वाटलं.
पण तिच तिथे अडकणं , सुटकेचे प्रयत्न ,सुटका सगळं थरारक आहे.

लोकहो, सध्या कोण काय वाचतंय यावर चर्चा करण्यासाठी वाचनकट्टा हा धावता धागा आहे.
https://www.maayboli.com/node/38865

वाचून झालेल्या पुस्तकांबद्दल लिहिण्यासाठी 'मी वाचलेले पुस्तक ०२' हा धागा आहे.

हा अज्ञातवासी यांचा वैयक्तिक ट्रॅकर धागा आहे.

@स्वस्ति - वेळ मिळाल्यावर वाचून बघावं लागेल मग. पण हे दहशतवाद, धार्मिकता वगैरे वाचायला बोअर होतं. Lol
@ललिता प्रीती - लिहू द्या हो. मलाही वाचायला काही नवीन मिळेल, कारण बरीच चांगली पुस्तके इथल्या चर्चेतूनच कळतात.

ललिता प्रीति+१.
अमकं पुस्तक वाचलं, आवडलं , इतकंच लि हीत असाल तर ठीक. पण सविस्तर अभिप्राय लिहीत असाल तर मी वाचलेले पुस्तक वरच लिहा.