आपली लाडकी मायबोली

Submitted by राजदीप on 14 January, 2020 - 09:11

पाण्यात राहून वैर माशाशी नको करूया
आनंदाने आपण सारे हसत खेळत राहूया
मायबोलीच्या अंगणी छान लिहू वाचूया
नको राग नको मत्सर प्रेमानं इथं नांदूया
नाही लहान नाही मोठा सगळे इथे समान
नवा नाही जूना नाही सर्वांना एकच मान
आदर देऊ आदर घेऊ नको करू अनबन
तू तू मैं मैं, तेरी मेरी, इगो बिगो देऊ सोडून
हमरी तुमरी विसरून जाऊ नव्या साली
झाल्या ज्या कुरबुरी देऊ त्या तिलांजली
राजी खुषीने नांदू धन्य कराया मायबोली
खूप काही दिलं तिनं तीच आपली मायबोली

Group content visibility: 
Use group defaults

छान !