स्मशानवैराग्य!

Submitted by अज्ञातवासी on 14 January, 2020 - 02:49

"रो मत अम्मी, खुदा कि बंदी थी..."
दिलशानने अम्मीला दिलासा दिला, आणि जनाजा निघाला.
सकीना, वीस वर्षाची कोवळी पोर. बिचारी, साप चावल्याचं निमित्त झालं,आणि गेली.
अब वो निकली थी, कब्रस्तान कि राहों पर...
----------------------------------------------
'ये येड्या... कब्रस्तान हाये ते. खविस झपाटल तुला...'
तो मात्र जायचं नाव घेईना.
जसा जनाजा जवळ आला, तशी ती टवाळ पोरे तिथून निघून गेली...
-----------------------------------------------
"परस्त्री, मातेसमान. आणि आपल्यासारख्या बैराग्यांना तर विषासमान. भोग... विषय... हे शरीराला नागासारखे दन्श करतात, आणि एकदा ते विष शरीरात भिनलं..."
गुरुजी हसले...
"तर मुक्ती नाही... मुक्ती नाही..."
----------------------------------------------
"गुरुजींचा शब्द... प्रणाम... शब्दाबाहेर गेलास... तर प्राणांत प्रायश्चित!!!"
"होय बाबा."
"आम्ही राहो न राहो... गुरुजी कायम असतील."
-----------------------------------------------
"आत्मा म्हणजेच सर्वकाही.... आत्मा सोडून गेला... कोण पुरुष, कोण स्त्री. फक्त जड उरलेलं शरीर...जे कुजून जाणार. जोपर्यंत आत्मा तोपर्यंत सजीव... आत्मा गेला..."
गुरुजी हसले...
"तर फक्त निर्जीव..."
------------------------------------------------
"हरामखोर... आश्रमातल्या पोरीवर नजर."
गुरुजी त्याला गुरासारखा बडवत होते.
कोपऱ्यात ती मान खाली घालून गालातल्या गालात हसत होती.
"लक्षात ठेव... वचन दे...कुठल्याही स्त्रीविषयी कामभावना मनात बाळगणार नाही."
त्याने वचन दिलं...
गुरुजींना दिलेलं वचन कधी मोडायचं नसत....
-----------------------------------------------
त्यादिवशी ती रात्री गुरुजींकडे गेली. हा जागाच होता.
'महिन्यातून चार पाच वेळा तरी जाते.'
-----------------------------------------------
ती मेली... साप चावला तिला.
अंत्यविधीच्या वेळी त्याने गुरुजींना विचारलं.
"गुरुजी, या शरीराला आता स्त्री म्हणायचं कि पुरुष? आत्मा तर निघून गेला."
गुरुजी हसले.
"हा तर फक्त जड देह!!!!"
तोही यावेळी हसला....
-----------------------------------------------
महिन्याभरात गुरुजीही साप चावून गेले.
हा भ्रमिष्ट झाला. त्याने आश्रम सोडला.
-----------------------------------------------
रात्र झाली...
'नाग्या... जा, तुही भक्ष्य शोध.'
त्याने पोतडीतून नाग काढला... फणा पसरून तो अंधारात निघून गेला.
त्याने कब्र उकरायला सुरुवात केली...
'आत्मा गेल्यावर स्त्री उरत नाही...
उरतं फक्त शरीर!!!!!!!!'

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नवीन बरच लिहायचं आहे (पण ते मायबोलीवर कि दुसरं कुठे याचा मी सिरियसली विचार करतोय), जुनं बरच पूर्ण करायचंय.
बघुयात!.....
Aadhi junya stories complete kra ... Waiting..

पहिल्या वाचनातच समजली..
जबराट झालीय...
फक्त एक नाही कळाल, ज्यावेळी गुरुजी त्याला मारत होते त्यावेळी ती हसत का होती???
म्हणजे तिने मुद्दाम आरोप केले का?

धन्यवाद जयश्री!
ती हसत होती कारण गुरुजी त्याला ज्या कारणावरून मारत होते, त्यापेक्षाही जास्त वाईट व्यवहार गुरुजी तिच्यासोबत करत होते.

Pages