तू जिवंत आहेस !

Submitted by Ehsas suleman on 14 January, 2020 - 00:59

तू जिवंत आहेस

पोटतिडकीने सांगणारा तू आठवतोस.
तू जिवंत आहेस.
आम्ही मेलेले मूडदे, जिवंत समजून निरर्थक तरंगणारे...
.
.
तू दुःखाविषयी म्हणतोस,
आकुंचित पावलेल्या कासवासारख खूप वर्ष जगणारं, टिकणारं, काळीजवाहू, काळजीवाहू.
ज्याने ज्याची त्याची ओली, कोरडी वाळू शोधावी. समुद्र व्हाव.
आणि एका लोप पावलेल्या संध्यासमयी बुजून जावं.
हि सततची संध्याकाळ ग्रेसने करकोच्याच्या तोंडातून सोडवली.
आणि सोडून दिली समुद्रतात निवांत पनाच्या पसरणाऱ्या डोहात.
तू तुझा व्यवसाय अव्याहतपणे सुरु ठेवलास कोणत्याही संकेतांची तमा न बाळगता.
तू रुतून रहा ओळीने कल्पवृक्षासारखा खोल, आणि उंच हात रुंदावून लाल, निळसर क्षितिजाला टेकवून.
पण एक बोट कंदिलासारख अखंड ठेव तेवत.
कारण बापाने घालायची असते अंघोळ नग्न होऊन
नागवं हिंडणाऱ्या पोराला.

Group content visibility: 
Use group defaults