मुलांचे फोटो सोशलसाईटवर प्रसिद्ध करण्यास लागणारी परवानगी

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 January, 2020 - 05:11

आपण ऑर्कूट काळापासून आजच्या फेसबूक ईण्स्टा काळापर्यण्त मुलांचे फोटो सोशलसाईटवर अपलोड करत आला असाल.

हे करताना आपण साधारण दोन गोष्टी लक्षात घेतो

१) मुलांची सुरक्षितता वा फोटोचा गैर्वापर होऊ नये.
२) मुलांना नजर लागू नये. (श्रद्धा वा अंधश्रद्धा जे काही असेल)

मायबोलीच्या ईतिहासात कोणी आजवर आपल्या मुलांचा फोटो ईथे टाकला आहे का नाही याची कल्पना नाही. (कोणी टाकला आहे का?)
पण आज माझ्या नाचाच्या धाग्यावर काही जणांनी माझ्या मुलांचे फोटो ईथे टाकता येतील का अशी विचारणा केल्यानंतर तिसराच मुद्दा उपस्थित झाला. त्या मुद्द्यावर स्वतंत्र चर्चा व्हावी म्हणून हा धागा.

आधी राजेश यांची पोस्ट जशीच्या तशी देतो
--------
फेस बुक असेल किंवा दुसरे कोणतेही सामाजिक प्लॅटफॉर्म.
तिथे तुम्ही वैयक्तिक सभासद आहात.
तिथे स्वतः व्यतिरिक्त कोणाचे ही फोटो प्रसिद्ध करण्याचं तुम्हाला (म्हणजे सर्वांना ) अधिकार नाही .
अगदी मुलांचे,बायकोचे सुद्धा .
ज्यांचे फोटो तुम्ही अपलोड करत आहात त्यांची अनुमती
ची आवश्यकता आहे.
-----------

आता राजेश यांच्या पोस्टवर मला पडलेले प्रश्न

१) बायकोचा परवानगीशिवय फोटो तर तसेही कोणी पुरुष टाकत नसावा. पण पोरांचे फोटो टाकायला एका पालकाची परवानगी पुरेशी ठरावी का? जर एका पालकालाच आपल्या पोरांचा फोटो शेअर करावासा वाटला तर त्याने प्रत्येकवेळी दुसरयाची परवानगी घेणे गरजेचे का?

२) अगदी लहान मुलांच्या फोटोची परवानगी साहजिकच पालक देणार पण मुलांची स्वत:ची परवानगी कोणत्या वयापासून घेण्यात यावी? कायदेशीर वय काही आहे का? नसल्यास शिष्टाचाराला धरून वगैरे सांगा...

३) माझ्या मायबोली डीपीवर मी ईतके दिवस शाहरूखचा फोटो त्याच्या वा त्याच्या पालकांच्या परवानगीशिवाय लावलेला वा आजही माझ्यासोबत कोलाज करत लावला आहे ते योग्य की अयोग्य? अयोग्य असल्यास कोणालाही आजवर आक्षेप घ्यायचे का सुचले नाही?

याव्यतिरीक्त कोणाला आणखी काही प्रश्न पडल्यास वा वेगळाच मुद्दा वेग्ळाच दृष्टीकोन मांडायचा असल्यास झरूर लिहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राजेश, माझ्याकडेही ते लाईक फ्लॅश होते. बहुधा टिकटॉक सारखे असावे. मी ते काय आहे हे बघायचीही तसदी घेतली नाही आजवर. फेसबूकवर कॉमेडी टिकटॉक विडिओ कधीतरी बघतो. दाक्षिणात्य मसालापट बघावे तसे. स्वत: तरी अजून तसले काही करायच्या फंदात पडलो नाही. पण काही लोकं अश्यात क्रिएटीव्हिटी दाखवणारेही असतात हे मात्र खरे...

>>>>>>> सामो, मी प्रोफाइल चेक करायला जात नाही, पण लेखाखाली फोटो दिसतो, त्यात तुमचा फोटो टीनएजर मुलीबरोबर आहे / होता. Wink>>>>
@मीरा - माझी लेक आता २० वर्षाची आहे.
मला वाटलेलं की ऋन्मेष यांची लेक फारच लहान आहे. अतिशय सुंदर आहे. त्यामुळे त्यांना सावधगिरीचा सल्ला दिला इतकेच.
बाकी वयाच्या दृष्टीने त्यांच्या व माझ्या मुलीची तुलनाच नाही.

प्रौढ आणि लहान मुलांचे अश्लील व्हिडीओ फेसबुक मेसेंजरद्वारे प्रसारित करणाऱ्या दार्जिलिंगच्या एका युवकाला ठाणे ग्रामीण पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. फेसबुकने दिलेल्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. परंतु या युवकासारखे उद्योग करणारे संपूर्ण राज्यात १९ ते २० जण असल्याची माहिती पुढे आली आहे. हे सर्वजण पोलिसांच्या रडारवर असून त्यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे.

एक लहान मुलगा शौचालयात अश्लील चाळे करत असल्याचा व्हिडीओ फेसबुकवर अपलोड करण्यात आला होता. या व्हिडीओबाबतची माहिती फेसबुकने भारताला दिली. त्यांनतर केंद्र सरकारने राज्य सरकारला कळवले. याविषयी कारवाईचे निर्देश ठाणे ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर

हो सामो, मुलगी लहान आहे. काळजीबद्दल धन्यवाद.
अर्थात २० वर्षांच्या मुलीलाही ईथले मुद्दे लागू आहेतच. लहान मुलांबाबत आपण जास्त सावधगिरी बाळगतो ईतकेच. अन्यथा वयात आलेल्या मुलींनी खरे तर जास्त काळजी घेणे गरजेचे आहे.
किंवा मग दुसरा मार्ग म्हणजे फारसा विचार न करता बिनधास्त वागणे. हे जमायला सेलिब्रेटी असणे गरजेचे नाही.

Pages