अस्तित्व

Submitted by यःकश्चित on 11 January, 2020 - 02:57

हव्याहव्याशा सुखांसाठी सहन मात्र दुःख फार केले
व्यथांच्या खेळात आता अस्तित्व जीवनाचे तडीपार गेले ||

कोण जाणे कुठली नाती, अकस्मात ही मज साद देती
तिच्या हाकेला हाक देऊन, घेतला मी हात हाती |
संकल्प होता शतजन्माचा, पण सुख मात्र दूर फार गेले
व्यथांच्या खेळात आता अस्तित्व जीवनाचे तडीपार गेले ||

तिचे दुःख काही केल्या कळेना, माझे सुख काही केल्या मिळेना,
आगपाखड दुःखावर ही, राख सुखाची काही केल्या जळेना |
लपाछपी ही सुखदुःखाची, सुख लपायला दूर फार गेले
व्यथांच्या खेळात आता अस्तित्व जीवनाचे तडीपार गेले ||

सुखांच्या मागे व्यथांचा पसारा, दुःख मात्र हास्यवदन घेऊन आले,
नियतीने जे लिहले होते, त्या दुखांचे आज सार्थक झाले |
बिलगुनी त्या दुःखांना अस्तित्व जीवनाचे यादगार झाले
अस्तित्व त्या सुखांचे होऊन खिन्न मात्र तडीपार झाले ||

Group content visibility: 
Public - accessible to all site users