मूकं

Submitted by Ehsas suleman on 8 January, 2020 - 23:40

मूकं

रागवून,
मी आईला छान शिवी दिली
आणि शाळेत गेलो.
संध्याकाळी.
आईचा पाय मुरगळून चांगलाच सुजला होता.
मी तिला हाक मारली.
ती गप्प.
मी तिचा पाय सुजण्याचे कारण विचारले.
ती गप्प.
मी लाडात येण्याचा सोज्वळ प्रयत्न केला.
तिचे डोळे.
मी गप्प.
एक.दोन.तीन.चार.पाच. दिवस
ती गप्प.
मीच उठायचो,
शाळेत जायचो,
नेटका अभ्यास करायचो,
खेळायचो,
वेळेत परत यायचो,
माझा मी झोपायचो,
ती गप्प.
एके सकाळी
मी शिवी शोधून काढली
तिलाच अर्थ विचारला
मी गप्प.

Group content visibility: 
Use group defaults