नको रे हरी

Submitted by Aadesh203 on 7 January, 2020 - 09:14

नको पाजळू हरी तुझी बरची
तूझ्या बरचीची घेतली मी धास्ती
तूझ्या हातातली धारदार बरची
गळा चिरून दावतो वाट वरची
तूझ्या बरचीनं दैना माझी केली
डोळ्यातली नीज पार उडली
माझ्या जीवाची घालमेल झाली
गळा रेतन्याची हौस तूज कसली
का बाप तूझा होता कसाई
माझा गळा चिरण्याची घाई
नको पाजळू हरी तूझी बरची

( बरची = कुऱ्हाडी सारखं हत्यार)

Group content visibility: 
Use group defaults