Submitted by अनन्त्_यात्री on 27 December, 2019 - 02:06
ते विस्मृत गाणे
धूसर होऊन
विरून जाते
पण नेणीवेच्या
अथांग डोही
अवचित दिसते
मग पुन्हा गीत ते
शब्दांच्याही
पल्याड नेते
अन् नकळत अश्रु
झरताना
ओठांवर येते
मग पुन्हा पुन्हा मी
घाव सोसुनी
लढत राहतो
अन् कितीही हरलो
तरी खळाळून
प्रसन्न हसतो
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुंदर! आवडली कविता.
सुंदर! आवडली कविता.
छान
छान
आवडली कविता
आवडली कविता
हरिहर, वेडोबा, आनंद
हरिहर, वेडोबा, आनंद प्रतिसादाबद्दल आभार!
क्या बात है....
क्या बात है....
छान कविता...
छान कविता...