गूढ अंधारातील जग -३

Submitted by सुबोध खरे on 26 December, 2019 - 08:41

गूढ अंधारातील जग -३

पाणबुडीतील आयुष्य

पाणबुडीत आयुष्य फार खडतर असतं. ते म्हणेज अक्षरशः तुम्ही एखाद्या यंत्राच्या आत मध्ये राहण्यासारखे असते, जेथे हवा पाणी आणि जागा या तिन्ही गोष्टी दुर्मीळ असतात. कारण पाणबुडीचा आकार जितका लहान करता येईल तितका चांगला (तितके तिला लपणे जास्त सोपे होते) आणि आहे त्या जागेत जास्तीत जास्त अस्त्रे, संवेदक(sensor), बॅटरी भरता येतील तितके भरले जाते.
त्यातून या खडतर जागेत काम करताना लोकांच्या हातून काम बिनचूक होणे अत्यावश्यक असते अन्यथा सर्वच्या सर्व लोकांच्या जीवाला धोका होऊ शकतो. अशा परिस्थितीमुळे पाणबुडीत काम करणाऱ्या लोकांची एकमेकांशी नाती अतिशय घट्ट होतात आणि ती बहुधा आयुष्यभर टिकून राहतात.
पाणबुडीत दिवस आणि रात्र असा प्रकार नसतोच कारण कुठेच खिडकी नसते. त्यामुळे तेथे घड्याळाकडे पाहूनच दिवस आहे कि रात्र हे ठरवावे लागते.
नौसैनिकांच्या मेंदूमध्ये दिवस रात्र या चक्रात गडबड होऊ नये म्हणून दिवसा पांढरे दिवे लावले जातात आणी रात्री अतिशय कमी प्रकाशाचे असे लाल दिवे लावले जातात.
तेथील दिवस हा १८ तासांचा असतो. म्हणजे सहा तासाच्या तीन पाळ्या असतात. जागा अतिशय कमी असल्याने तीन जणाना मिळून दोन बिछाने असतात. आणि हे सुद्धा जिथे जागा मिळेल तिथे टाकलेले असतात. कित्येक वेळेस सैनिकांना ५५ सेमी व्यासाच्या( पावणे दोन फूट) टॉर्पेडो ट्यूब
(पाणतीर नलिका) मध्ये झोपावे लागते.
प्रत्यक्ष पाणबुडी जेंव्हा डिझेलवर चालत असते तेंव्हा त्याच्या इन्जिन , जनरेटर , पम्प यांचा सर्वांचा भयानक आवाज येत असतो. कारण आतला आवाज बाहेरच्या जहाजाला येऊ नये म्हणून पाणबुडीच्या बाहेरच्या कवचावर आवाजरोधी रबराचा एक जाड थर लावलेला असतो. त्यामुळे हा आतला आवाज पण बाहेर जात नाही.
आपल्याला रिकाम्या वेळात संगीत ऐकायचे ते एखाद्या पिठाच्या चक्की वर बसून कसे ऐकायला येईल तसा पार्श्वभागावर आवाज चालू असतो. आपला झोपायचा बंक पण हादरत असतो.
आपण एकदा पाण्याखाली गेलो कि बाह्य जगाशी कोणताच संपर्क राहत नाही. त्यामुले ताज्या बातम्या जगात काय चाललं आहे याचा सैनिकाचा काहीही संबंध राहत नाही.
( अनुभव म्हणून हे थोडे दिवस ठीक असेल पण आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा काळ फुकट गेला अशीच भावना माझ्या मनात कायम येत असे)
पाणबुडी पाण्याखाली असताना त्यात पाणी हे अतिशय मूल्यवान असते. त्यामुळे कपडे धुणे सारख्या कामाना पाणी नसतेच. सैनिक फिकट निळ्या रंगाचे ढगळ असे सुती कपडे घालतात आणि दर तीन दिवसांनी हे कपडे टाकून दिले जातात.(disposable)

मी विक्रांत या विमानवाहू नौकेवर वर असताना आमचे कॅप्टन रवींद्रनाथ गणेश हे भारताची पहिली अणू पाणबुडी "चक्र"चे कॅप्टन म्हणून काम करून विक्रांतवर कमांड करायला आले होते. एक दिवस विभागप्रमुखांच्या सभेत ते अधिष्ठासी अधिकाऱ्याला(executive officer) सांगत होते कि माझ्या बाथरूम मध्ये फक्त "अर्धी" बालदी पाणी होते त्यात अंघोळ करणे कठीण गेले त्यावर आमचे कमांडर एअर त्यांना म्हणाले सर आता तुम्ही "पाणबुडीत" नसून एका बलाढ्य अशा विमानवाहू नौकेवर आहात. तुमच्या साठी वेगळे न्हाणी घर असून तेथे कमांडिंग अधिकारी याची खास सोय(privilege) म्हणून तुम्हाला २४ तास गरम आणि गार असे आणि पाहिजे तेवढे पाणी उपलब्ध आहे.
त्यांना चक्र सारख्या "अणू पाणबुडीचे" कमांडिंग अधिकारी म्हणून (privilege)"विशेष सोय" म्हणून एक बालदी पाणी मिळत असे.

सैनिक जेंव्हा गस्तीवर जातात तेंव्हा आपल्या घरून अत्यंत कमीत कमी सामान घेऊन येतात. कारण प्रत्येक माणसाला फार तर एक सुटकेस ठेवता येईल एवढीच जागा दिलेली असते.

सर्वच्या सर्व नौसैनिकांना दर तीन महिन्यांनी याच टॉर्पेडो (पाणतीर) नलिकेतून अंधाऱ्या रात्री पाणबुडीच्या बाहेर पडण्याचा (escape) आणि पोहून सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सराव करावा लागतो.
ज्यांनी अंधाऱ्या रात्री समुद्रात पोहण्याचा अनुभव घेतला आहे त्यांना हे किती भयाण आहे त्याचा अनुभव येऊ शकतो.

पाणबुडीच्या लपून राहण्याचे मुख्य कारण ती अजिबात आवाज करत नाही. हा आवाज होऊ नये म्हणून प्रत्येक नट बोल्ट ला रबरी वॉशर लावलेला असतो. डिझेलच्या इंजिन, जनरेटर, पम्प, पाईप या सर्वांच्या हादऱ्यांमुळे हे नट आणि बोल्ट सारखे ढिले होऊ नयेत म्हणून ते सारखे घट्ट करत राहायला लागते.

पाणबुडीची डिझेल इंजिने हि जनरेटर चालवतात. या जनरेटर वर तयार होणाऱ्या विजेनेच पाणबुडीचा पंखा चालतो आणि याच विजेने त्यातील बॅटरी चार्ज होत असते. हि बॅटरी कायम उत्तम स्थितीत ठेवावी लागते त्यातील सल्फ्युरिक आम्ल पाणी याची पातळी कायम ठेवावी लागते. त्यात तयार होणारी सल्फ्युरिक आम्लाची वाफ बाहेर कुठेही जाऊ शकत नसल्याने पाणबुडीतील हवेचा दर्जा खालावू नये म्हणून त्यावर डोळ्यात तेल घालून पहारा ठेवावा लागतो.

समुद्रात खोल गेल्यावर पाण्याचे तापमान ४ अंश सेल्सियस असते त्यामुळे पाणबुडीचे तापमान सुद्धा वर आणावे लागते( हवा गरम करावी लागते) आणि किनाऱ्यावर आले कि तापमान २४ ते ३८ अंश से असते ते पण नियन्त्रित करावे लागते( हवा थंड करावी लागते).

पाणबुडीतील स्वयंपाक घर हेही अतिशय लहान असते आणि तेथील सर्व स्वयंपाक हा विजेच्या शेगडीवरच करावा लागतो. त्यामुळे भारतीय पद्धतीचा स्वयंपाक विशेषतः फोडणी सारख्या गोष्टी जरा जपुनच कराव्या लागतात. त्यामुळे तेथे मिळणारे अन्न हे जास्त करून अगोदरच तयार केलेलं असते. तरीही अशा बंद जागेत इतर फारशी कोणतीही सुखसोयी नसल्यामुळे सैनिक जेवणाबाबत जास्त काटेकोर असतात. यामुळे त्यांना नुसतेच चविष्ट नव्हे तर पौष्टिक अन्नहि मिळेल अशी व्यवस्था करावी लागते.

पाणबुडी जेंव्हा गस्तीवर निघते तेंव्हा ती किती दिवस जाणार आहे आणि कुठे जाणार आहे हे त्या पाणबुडीच्या कॅप्ट्नलाही माहित नसते. त्याला हि आज्ञा बंद लिफाफ्यामध्ये बंदर सोडताना दिली जाते. साधारण शिधा आणि रेशन किती दिवसाचे भरले आहे यावरून सैनिक अंदाज करत असतात. पण आपल्या मागे आपल्या कुटुंबाला काही गरज लागली तर काय करायचे याची सर्व तजवीज सैनिकाला करून ठेवावी लागते. घरचे कोणी आजारी असेल काही महत्त्वाचे काम असेल तर काय करायचे याची काळजी सुद्धा मागे ठेवूनच सैनिकाला निघावे लागते.

बाकी युद्धाचा सराव सारख्या गोष्टी तर होतच राहतात. सैनिकांना तंदुरुस्त राहण्यासाठीपाणबुडीत एक ८ x १० फुटाची छोटेखानी व्यायामशाळा पण असते. लोक तेथे व्यायाम करून आपले वजन नियंत्रणात ठेवतात. शिवाय पाणबुडीत तळण्याची प्रक्रिया जवळ जवळ करताच येत नाही. त्यामुळे तेथील आहारात तेलाचा वापर कमीच असतो शिवाय मिताहार आणि वजन नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीनेच आहार तयार केला जातो. त्यात सर्व तर्हेची जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतील अशा तर्हेची सोयही केली जाते.
ड जीवनसत्त्व हे सूर्य प्रकाशातुन मिळते. साधी पाणबुडी ३०-४५ आणि अणुपाणबुडी ९० दिवसाच्या गस्तीवर जातात तेंव्हा त्यांना असा सूर्यप्रकाश मिळत नाही त्यामुळे त्यांना दर महिन्याला ६०, ००० IU ची गोळी महिन्याला एक या प्रमाणात दिली जाते. (अशा नौसैनिकांची गरज रोज १००० IU इतकी असते)
पाणबुडीवरील नौसैनिकांच्या आहारात रोजच्या रेशन व्यतिरिक्त अतिरिक्त चीज बटर आणि इतर दुधाचे पदार्थ पण अंतर्भूत असतात.

पाणबुडी हो दंडगोलाच्या आकारात असल्यामुळे अगदी शांत समुद्रातही ती भरपूर गोल डोलत(rolling) असते आणि खवळलेल्या समुद्रात तर ती भयानक हलते. ४५-६०डिग्री इतकी दोन्ही बाजूना. ४५-६०डिग्री इतकी दोन्ही बाजूना म्हणजे ३० डिग्री एका बाजूला.त्यामुळे समुद्र खवळलेला असेल तर बहुसंख्य नौसैनिक पाणबुडी पाण्याखालीच असेल तर बरे असे म्हणतात.

पाणबुडी हि साधारण २०० ते ४०० मीटर इतक्या खोलीपर्यंत डुबकी मारून जाते तेथे तिच्यावर असणारा पाण्याचा दाब हा सदर १० मीटर ला १ atm किंवा १ kg/ sq cm असतो म्हणजेच १०० मीटर खोली वर हा दाब ११ atm किंवा साधारण ११ kg/ sq cm असतो. आपल्या कारच्या टायर मध्ये २. ५ kg/ sq cm इतका दबाव असतो

तेथे ४० जणांना मिळून एक किंवा दोन संडास असतात आणि त्याचा मैला पाण्याखाली असताना बाहेर टाकण्यासाठी दाब देऊन बाहेर टाकणारी पम्पावर चालणारी प्रणाली असते त्यात पहिल्यांदा मैल एका पाईप मध्ये घेऊन वरील झडप बंद करावी लागते बाहेरील झडप उघडावी लागते आणि मगच पम्प चालू करावा लागतो यात काही चूक झाली तर याच संडासात मेल्याचे कारंजे उडते. हा अनुभव जवळ जवळ १००% सैनिकांनी घेतलेला असतो.

प्रत्येक ठिकाणी असे डोळ्यात तेल ठेवून काम करावे लागते.

सैनिकांना शारीरिकच नव्हे तर मानसिक दृष्ट्या पण खंबीर असावे लागते. कारण महिनोन्महिने कुटुंबापासून दूर अंधाऱ्या जगात ते राहतात जेथे अन्न वस्त्र आणि निवारा सारख्या मूलभूत गरजा सुद्धा नीट पूर्ण होत नाहीत.

मानाची म्हणून समजली जाणारी नोकरी प्रत्यक्ष काय असते याची सामान्य माणसाला साधी जाणीव ही नसावि याची खंतही काही वेळेस आढळून येते. हे सर्व मागे टाकून हि माणसे काय मानसिकतेने तेथे नोकरी करत असतात याचे मला राहून राहून फार आश्चर्य आणि कौतुक वाटते.

लष्करातील( भूदल वायुदल आणि नौदल) कमांडो आणि पाणबुडीतील सैनिक हे अतिशय समर्पित(dedicated) भावाने काम करत असतात. पाणबुडीतील नौसैनिक हे सुरुवातीला काही तरी रोमांचक करायचे म्हणून भरती होतात परंतु त्यांच्या प्रशिक्षणानंतर अतिशय खडतर आयुष्य असले तरी फारसे कोणी सोडून जात नाही( वैद्यकीय कारणामुळे बाहेर काढावे लागलेले सोडून). अगोदर त्यांना यासाठी मिळणारा भत्ता फक्त १२०० रुपये होता. या तुटपुंझ्या पैशासाठी कधीच कोणी पाणबुडी जॉईन करत नव्हते.

हा भत्ता ६ व्या वेतन आयोगा ने तो हुद्द्याप्रमाणे ५००० ते १०,०००/- केला आणि आता ७ व्या वेतन आयोगात तो १०००० ते २०,०००/- केला आहे असे ऐकतो. हे निदान काही तरी सन्मान्य(RESPECTABLE) आहे

पण अशा "भत्त्यासाठी" आयुष्यभर अंधारात काढणे हे फारच जास्त आहे.

अशा नाही चिरा नाही पणती म्हणून जगणाऱ्या माणसांना माझ्या तर्फे एक दंडवत.

प्रत्यक्ष पाणबुडीत काम कसे चालते हे पाहण्यासाठी आपण रॉकी आणि मयूर यांच्या हायवे ऑन माय प्लेट या कार्यक्रमाचे हे दोन व्हिडीओ जरूर पहा.
https://www.youtube.com/watch?v=aCSa0xglJNc
https://www.youtube.com/watch?v=MEO9l5jq_iM
क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Rahesh188 तुमच्या आयडीचा जन्म झाला तेव्हा त्याला अँटिडोत म्हणून काही निर्माण झाले नाही का?

पाणबुडी काय धोका पोचवू शकते हे माहीत झाल्यावर शत्रू च्या पाणबुडी वर कस लक्ष ठेवायचे आणि योग्य वेळी ती कधी नष्ट करायची ह्याचा विचार झाला नसेल अस नहीं
काही गोष्टी ह्या गुप्त च असतात जनतेच्या माहिती साठी ओपन केल्या जात नाहीत.
कोणताच देश त्यांचे प्लस पॉइंट जगाला सांगणार नाही.
ह्या लॉजिक वर मी बोललो आहे.
मी काही पाणबुडी कशी शोधायची आणि कशी नष्ट करायची ह्या वर संशोधन केलेले नाही.

बाप रे! हे काहीही गावी नव्हते. खूपच रोचक माहीती आहे.

जगाचा ७१ % भूभाग हा पाण्याने व्यापलेला आहे. अमर्यादित ऊर्जेचा स्रोत घेऊन फिरणाऱ्या अणुपाणबुडीला ५० कोटी चौरस किमी मध्ये शोधून काढणे निव्वळ अशक्य आहे या गृहितकावर अणुयुद्धातील SECOND STRIKE CAPABILITY म्हणजेच शत्रू ने आपल्या संपूर्ण भूभागावर अण्वस्त्र हल्ला करून तो जाळून टाकला तरी जगभरात कुठेतरी लपून बसलेल्या पाणबुडीतून प्रखर प्रतिहल्ला करून शत्रूचा संपूर्ण नायनाट करता येईल हि क्षमता निर्माण करणे.
या MAD (MUTUALLY ASSURED DESTRUCTION) म्हणजे उभयपक्षी सर्वनाश या तत्वामुळे अण्वस्त्रधारी राष्ट्रे युद्ध करू पाहत नाहीत.
आजपर्यंत आम्ही अणुहल्ला करू या पाकिस्तानच्या धमकीला आपले सरकार घाबरत आले होते.
बालाकोटच्या हल्ल्यानंतर श्री मोदी यांनी पाकिस्तानला सज्जड धमकी दिली कि तुम्ही प्रतिहल्ला केलात तर पाकिस्तानचे नाव जगाच्या नकाशावरून नष्ट करून टाकू. ते एवढेच करून थांबले नाहीत तर आपल्या दोन्ही अणुपाणबुड्या ( चक्र आणि अरिहंत) आणि विमानवाहू नौका विक्रमादित्य तिच्या सर्व विमाने विनाशिका आणि इतर जहाजांसकट पाकिस्तानजवळच्या समुद्रात तैनात केल्या आणि जास्त साहस केल्यास आम्ही सर्वंकष युद्धात उतरू हे स्पष्टपणे सांगितले त्यामुळे पाकिस्तानने शेपूट घातली.

Soon after the Balakot air strikes, Indian warships, submarines and aircraft had swiftly transited from the then ongoing “Tropex-2019” exercise, which included aircraft carrier INS Vikramaditya and nuclear submarines INS Arihant and INS Chakra, to operational deployment in the north Arabian Sea to “box the Pak Navy close to the Makran coast”, said offici

Read more at:
http://timesofindia.indiatimes.com/articleshow/71302822.cms?utm_source=c... ..

Soon after the tensions spiked, the Navy had deployed over 60 warships, including the aircraft carrier INS Vikramaditya, along with its battle group as part of a rapid redeployment in the North Arabian Sea.

https://www.indiatoday.in/india/story/post-balakot-indian-navy-hunted-pa...

अनु युद्ध मध्ये ज्याच्यावर अण्वस्त्र टाकले जाईल तो नष्ट होईल च पण जो शेजारी देश टाकेल त्या देशाला सुद्धा रेडिएशन चा परिणाम भोगायला लागेल.
आणि आजच्या शक्ती शली अण्वस्त्र मुळे पृथ्वी चे हवामान,magnetic field,वातावरण ह्या वर सुद्धा दुष्परिणाम होवू शकतो.
एकंदरीत युद्ध जिंकणारा जिंकण्याचा आनंद उपभोगू शकणार नाही.

Pages