एकटेपणाची जीण.

Submitted by ashokkabade67@g... on 21 December, 2019 - 12:23

काल मीत्र घरी आला नेहमीप्रमाणे तोंड फुगलेले थोडा टेंशन मधेच होता .मी काय समजायचे ते समजली आई आणि बायकोच्या भांडणात बिचाऱ्याच सॅण्डविच झालं असावं.मी त्याला काहीच विचारल नाही कारण मला माहित आहे की थोड्या वेळात हा मनातलं भडाभडा ऐकायला लागेल आणि जास्तच हळवा झाला तर माझ्या खांद्यावर डोके टेकवून रडायलाच लागेल,तसं मेलेल्या माणसाला कुणीही खांदा देतय हो,पण जीवंत माणसाला रडण्यासाठी आपला खांदा देण्यासारखं पुण्य नाही असं म्हणतात आणि दुर्दैवाने पुण्य करण्याचं हे काम सटवाईन माझ्या भाळी लीहील असावं.,कारण मी जोडलेला प्रत्येक माणूस जेंव्हा दुखावला जातो तेंव्हा त्याला माझा खांदा त्याला द्यावाच लागतो..आताही त्याला मी काहीच न विचारता चहा टाकला. चहाचा कप त्याच्या हातात देत म्हटल आधी चहा घे नंतर बोलू.गरमागरम चहा पोटात जाताच तो हळूहळू शांत झाला म्हटल सांग आता काय झालं,अरे नेहमीचिच कटकट आईला काही बोलता येत नाही,नी बायकोला काही सांगता येत नाही त्यांच्या भांडणात माझं मात्र सॅण्डविच होत,सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी गत झाली आहे विचार करून करुन डोकं फुटायची वेळ आलीय आता, विचार करतोय दूर बदली करून घ्यावी नि एकट्याने रहावं तुझा हेवा वाटतो बघ एकटा रहातोस मजेत जगतोस ,त्याला समजावत म्हटल अरे ,सारं ठीक होईल मी भेटतो त्यांना. खरंतर मी त्यांना भेटणारच नव्हतो मला माहित आहे की दोन दिवसांत सारं पुर्ववत होईल.खिडकीतून बाहेर पहात असता अचानक त्याच लक्ष आभाळाकडे गेलं आभाळ दाटून आल होत येतो रे पण घरी येऊन बोल दोघींनी. असं म्हणत तो निघुन गेला.आभाळ भरुन आल नि अंधारुन आलं बहुतेक वातावरणाचा परिणाम असावा मनातही मळभ दाटून आलं आणि एक प्रश्न मनात फेर धरून नाचू लागला.,एकटं जगणं काय असतं ॽ उत्तर आलं तुलाच ते चांगलं माहीत अाहे पण सांगतो. सकाळच्या पहिल्या चहात कधी साखर टाकायला विसरलो म्हणुन चहाचं सपक पाणी गोड मानून प्यायच असतं,तर कधी पोळी भाजताना हातावर येते वाफ आणि आठवतो आपल्याला आपलाच बाप पण त्याकड दुर्लक्ष करत फोडणिसाठी कढयीत तेल टाकायचं असतं,तर कधी येतो खुप कंटाळा,मग चहा ब्रेड वर भागवायची असतं तर कधी उपाशीपोटीच अंथरुणात शीरायच असतं . कधि कधी येतो खुप संताप अंगाची लाही लाही होते मग कुणावर तरी रागवावस वाटत पण समोर कुणीच नसतं मग मनातल्या मनात आकडे मोजत स्वताला शांत कराय असतं आणि आपल्याच मुर्खपणावर खुप हसायचं असतं,कधी एखादया रात्री सपान पडत नी जाग येवून आपलं भविष्य आपल्याला दिसत आणि दडपण येवून डोळे टक्क उघडे ठेवून रात्रभर जागायच असतं पहाटे पहाटे मग लागतो डोळा उठायची इच्छाही नसते पण तरीही उठायची असतं कारण घरातली काम करायला कुणीच नसतं ,खुपचं एकटं वाटलं कधी तर मन कुठेतरी गुंतवायचे असतं कधी वाचायचं तर कधी लिहायचं असतं.माणसाला माणूस जोडायचे असतं मित्रपक्षांना मात्र तोडायच नसतं ,कारण कधी अंगात भरतो ताप तेंव्हा त्यानाच द्यावी लागते हाक एकाला कळलं की मग सारे धावत येतात . एकटेपणाची दुःख मनातल्या कोपऱ्यात दडपायच असती चेहऱ्यावर हास्य कायम ठेवायची असत,कारण आपणच हे सारं स्विकारलेल असतं म्हणून दुःख करायचं नसतं. आपले असतात खुप दुर त्यांच्याशी कधी खरं तर कधी खोट बोलायचं असतं कारण त्यांना त्यांच्याच चिंता असतात भरपुर आपल्या काळजीनं त्याना दुःख द्यायच नसतं प्रत्येक उगवणाऱ्या नव्या दिवशी नव्या आशा नव्या आकांक्षा सोबत घेऊन धावायचं असतं .असं हे एकट्याच जीण आनंदाने जगायचे की दुखान रडायचं हे ज्याचं त्यान ठरवायचं असतं, ज्याचं त्यान ठरवायचं असतं.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults