नवे वर्ष

Submitted by Athavanitle kahi on 20 December, 2019 - 02:31

नवे वर्ष - @C आठवणीतले काही

एक एक करत दिवस पुढे सरकत आहे
नव्या वर्षाची चाहूल, जुने वर्ष सरत आहे

अनेक आठवणीं नी प्रसंग
गोड आठवणी कधी दुभंग
झाले गेले सोडून मी सारे विसरत आहे
नव्या वर्षाची चाहूल, जुने वर्ष सरत आहे

मीही दिले असेल कधी दुःख
मागेन माफी म्हणेन क्षमस्व
जुनी नाती टिकवून नवी नाती जोडत आहे
नव्या वर्षाची चाहूल, जुने वर्ष सरत आहे

नव्या दमाने नवी ही मांग
नव्या वर्षा नवे काही सांग
पुढे पुढे जाताना मागचे ही सोबत आहे
नव्या वर्षाची चाहूल, जुने वर्ष सरत आहे

Group content visibility: 
Use group defaults