- जिवलग मैत्रीस

Submitted by सोहनी सोहनी on 12 December, 2019 - 02:13

- जिवलग मैत्रीस

ह्या भरल्या नभासारखं हे रिक्त अंतरंग अवचित भरून येते
एक अधीर, अनामिक अशी हुरहूर ह्या मनाला लपेटून राहते...

आठवांचे काहूर मग हळुवार मनाच्या पटलावर स्वार होते
येताना सोबतीला तीच जुनी तळमळ नव्याने जाणिवेत भरते...

जाणीवा सर्व आताशा शिथिल तरीही तुझी उणीव मनाला काचते
मनाच्या अथांग वावरातून रिक्ततेचे स्मरणई वारे सर्वांग व्यापते...

स्मरणांच्या बाहेरील दुनियेत हे मन खुळ्यागत तुझे अस्तिव्त शोधत असते
तुझे कधीच न दिसणे अन मनाचे काकुळतीस येणे मात्र ठरलेलेच असते...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults