सिगारेट.....

Submitted by अमृत जोशी on 10 December, 2019 - 11:28

बाहेर कोसळणारा मुक्त पाउस, भर उन्हात..
मग तोच पाउस, तेवढाच मुक्त,त्याच्या मनात..
एक सिगारेट त्याच्या ओठांशी...क्षणभर...
पेटण्याआधीच विझलेली..मनभर...

सिगारेटपुढे ती नेहमी हरायची
मोकलून त्याला म्हणायची...
'बघ हा.. अजुन एक सिगारेट ..आणि
समज आपली शेवटची भेट...! '

रोजचं द्वंद्व त्याच्या आत.. 'सिगारेट' का 'ती' ?
संपायच्या आतच आणि, समोर असायची 'ती'
सिगारेट सकट स्विकारायला तिचा नकार..
त्याचा हटट एकच..'मला आहे तस्सा स्वीकार'..

कित्ती हळवे क्षण, आणि कित्ती आठावणींच्या ओळी..
कधी तो तिच्या जवळ..हव्याहव्याश्या वेळी..
सारे सारे काही, सिगारेटच्या राखेसोबत पोळलेले..
तिने त्याला सोडल्यावर,त्याने सिगारेटला सोडलेले ...

तो दुःखी..तो हसरा वरुन-वरुन फक्त..
तिच्यामुळे..तिच्याही नकळत, व्यसनातुन मुकत

Group content visibility: 
Use group defaults

झकास!

शब्दांकन छान आहे.
पण मतितार्थ (मला जो समजला, तो मला) खटकला.

शेवट विरहाचाच हवा असेल तर तो "तिच्या मुळे, तिच्याही नकळत त्याला कायमचे दु:ख"
असाही होऊ शकतो.

इथे ती म्हणजे सिगारेट.

सिगरेट Angry Angry Angry
कवितेच्या शेवटी त्याची सवय सुटली. व्यसनातुन मुक्त झालेला दाखवला. हे आवडल.