स्युडो कवी !

Submitted by अमृत जोशी on 10 December, 2019 - 11:05

मी शब्दांना जोडीत जातो...
अन अर्थाला तोडीत जातो..
निरर्थकाचे सारे-सारे ,
कविता म्हणुनी ओढीत जातो..

मी शब्दांचे बांधून इमले..
जे लिहतो,ते कुणा न गमले..
सहज सोपे सोडून सारे..
अगम्य कडवे खरडीत जातो..

यमकांमधले रुक्ष खेळही..
अन जुळवतो छन्दमेळही..
जे लिहतो ते राखून हातचे..
खुद्द स्वत:ला फसवत जातो ..

मला न कळली कविता फार ..
तरी लिहिण्याचा घेऊन भार ..
जाण, जाणत्या रसिकाला मी ..
माझ्यावरती हसवीत जातो..

Group content visibility: 
Use group defaults

मला काव्यतलं फारसं कळत नाही पण तुम्ही काय लिहिता हे तुम्हाला तरी स्पष्ट कळलं आहे असं दिसतंय. कुणीतरी कविता उलगडून सांगावी असं मला फार वाटतं खूपदा.

छानेय तुमची कविता!! Happy माझ्या कविता काहीशा अशाच असतात..

मनात आलं कि
डायरीत खरडायच
त्या अर्थहीन ओळींना
कवितेच लेबल चिकटवायच
र ला ट जोडायच
अन् काहीतरी जमलय
यातच समाधान मानायच!
Lol Lol