संस्थळीय प्रवास - लेखाजोखा

Submitted by सामो on 9 December, 2019 - 10:32

मी सर्वात प्रथम मराठी फोरम्सकडे वळले ते 'मराठीशी नाते घट्ट राहावे' या हेतूने. इतके अस्खलित मराठी , अनवट शब्द प्रयोग, वाक्प्रचार, म्हणी, चर्चा खूप वर्षांनी कानावर पडत होत्या. फार मजा आली. पुढे मराठीने पोट भरले, तृप्तीचा ढेकर आला (आली?).

मग माझा मोटिव्ह (हेतू) थोडा थोडा उत्क्रान्त होऊ लागला. अरे आपल्यालाही काहीतरी लिहिता आले पाहिजे. निदान प्रयत्न करायला काय हरकत आहे. आणि मग एका फेझ अशी आली जेव्हा मी खरंच रोज जिलब्या टाकून स्वतः:वर टीकेची झोड उठवुंन घेत होते, टीकास्त्राने, घाबरूनही जात होते. ट्रोलिंगमुळे नाकी नऊही येत.

पुढे ती फेझ गेल्यावर वाटू लागले, आपल्यातील वैगुण्ये किंवा आपल्या मर्यादा शोधून, त्यावर मात करता येते का ते पाहावे. उदाहरणार्थ - वैचारिक क्लॅरिटी , सांगोवांग, अष्टपैलू विचार, निर्णयाक्षमता आपल्यात नाही. ती डेव्हलप करता येते का ते पाहावे. अन्य सदस्य, डोके ताळ्यावर ठेऊन, तार्किकदृष्ट्या कसे विचार करतात, हातघाईवर ना येता, विरोधी विचारांचे खंडन कसे करतात, त्याचे निरीक्षण कर. तुला त्यातून काही शिकता येते का ते पहा. तुझ्या आश्वस्त परिघाबाहेरचे विषय देखील इथे चर्चिले जातात, ज्यामुळे तुला फायदा होऊ शकतो. सामान्यज्ञान, राजकारण, पुस्तके, लेखक-कवी, मनोरंजन (विरंगुळा), काल्पनिक/वास्तव दोन्ही प्रकारचे साहित्य असा एका buffet आहे. जितका उपभोग घेशील तितके पुरून उरणारे.

क्वचित वाटले, इथे मैत्रिणी मिळतील आणि तशा मिळाल्या देखील. एका फेझ अशी आली , ज्या संस्थळावर वावर असे, ते इतके आवडे, त्याबद्दल इतके ममत्व वाटे कि मी त्याशी एकनिष्ठ राहात असे. पण पुढे पुढे त्यातील folly अर्थात स्वतः:चा तोटा लक्षात आला. असा माझा तरी एकंदर 'मराठी संस्थळांवरती' प्रवास झाला.

क्वचित वाटले, अरे संस्थळ तर नवीन कौशल्ये आत्मसात करण्याची प्रि-स्कूल आहे, माँटेसरी आहे. उदाहरणार्थ - प्रत्येकाला विरोध केला तर, विरोधाला पुरुन उरलो, तर कदाचित नेतृत्वगुण आत्मसात करता येतील. ते कधीही जमले नाही ही गोष्ट अलहिदा. Happy

अन्य सदस्यांना, येथे काय शिकायला मिळाले, आपला प्रवास कसा होत गेला, ते ऐकायला खूप आवडेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

संस्थळावर असणे चांगलं. मराठी संस्थळांचं एक विशेष स्थान आहे. क्वोरा तसं नाही. फेसबुक, ट्विटर, वाटसपही तशी नाहीत. मर्यादा आहेत.
मला कुणाशी चर्चा करायची आहे, बोलायचं आहे ,मोकळं व्हायचंय हे जगाच्या कानाकोपऱ्यातल्या पर्यंत पोहोचून साध्य होतंय. २०१५ च्या आसपास सात संस्थळं होती आता चारच राहिली.

मी फक्त २ संस्थळावर आहे.
मर्यादित वावर आनंद देतो.
छापील माध्यमापेक्षा इथे वाचक संवाद छान होतो.

मला नेहमीच संस्थळांना भेटि देणे, लिदेणे, प्रतिसाद देणे हे जमले नाहीये. बर्‍याचदा खंडही पडला आहे. मा.बो.वरही गेली अनेक वर्षे मी सभासद आहे, परंतू अनेकवेळा वाचनच केले आहे.

जसे जमेल तसे ज्ञान घेणे हेच करत आले आहे व कुमार म्हणाले तसं मर्यादित वावर आनंददायी आहे!

मी अगोदर मिपावर लिहायचो. नंतर माबोवर आलो व येथेच रमलो. मला मिपा जरा किचकट वाटली. माबो अगदी सुटसुटीत आहे. वाचन मात्र आता खुप कमी झालय.

सांगायला विसरलो. अत्यंत नतद्रष्ट आणि विकृत माणसामुळे मी माझा मिपावरचा आयडी काढून टाकायला लावला. ती विकृती येथेही सक्रीय आहे. त्यामुळे मी अनेक ठिकाणी, अनेक धाग्यावर प्रतिसादही देणे थांबवले. मला आयूष्यात वाईट माणसे का भेटली नाही असा प्रश्न पडायचा. या हलकट मानसाने माझी ती हौसही पुर्ण केली. हे मात्र आवर्जून सांगावे लागेल की हा माणूस माझा सगळ्यात मोठा फॅन आहे. माझे लेख त्याला अगदी तोंडपाठ आहे. त्याने लिहिलेल्या लेखावर माझी छाप आहे.

एखाद्या माणसामुळे आपण संस्थळ सोडावे अशी कोणाचीही लायकी नाही. आपण त्याला अतिरिक्त महत्व दिल्यामुळे संस्थळावरील इतर आपल्या चाहत्यांवर आपण अन्याय केला असे मात्र खेदाने म्हणावे लागेल. आपला पक्षांवरील धागा मी आवर्जून वाचतो आणि आनंद घेतो. मिपावरील आपला आय डी कोणता हे माहीत नाही.

>>>>छापील माध्यमापेक्षा इथे वाचक संवाद छान होतो.>>>> + १
>>>>मला आयूष्यात वाईट माणसे का भेटली नाही असा प्रश्न पडायचा. या हलकट मानसाने माझी ती हौसही पुर्ण केली. >>>> Sad
सर्व प्रकारचे लोक या जगात आहेत. तसेच एकच व्यक्ती विविध प्रसंगात, विविध गुणावगुण दर्शन करु शकतात.
>>>>एखाद्या माणसामुळे आपण संस्थळ सोडावे अशी कोणाचीही लायकी नाही. >>> + १

सामो, खुप मस्त्त धागा,

लवकरच वेगळा धागा काढुन लिहिणार होते पण हा धागा अगदी योग्य आहे. वेळ मिळाला की सविस्तर लिहिते.

मी फक्त मायबोलीवर आहे त्यामुळे मी मला ऊमगलेल्या मायबोलीचा लेखाजोखा मांडतो.
( हे माझे वैयक्तिक मत आहे आणि काही बाबतीत ते चुकीचे असू शकते. )
उडदामाजी काळे गोरे तसे इथेही आहे हा माझा अनुभव. पण असं असलं तरी इथे चांगले लोकही भरपूर आहेत. कोणाला काही माहिती / अथवा मदत हवी म्हटलं की धावच घेतात. कथा, लेख, कविता न लिहिणा-या व्यक्तींचे इतर धाग्यांवरचे प्रगल्भ प्रतिसाद खुप काही शिकवतात, आनंद देतात. सशक्त लिखाणाचे उत्तम जाणकार जसे आहेत तद्वत दे टाळी मला, घे टाळी तुला असे म्हणणारे आहेत. काही तर न बोलावता धाग्यावर पाॅपकान, थंडा घेऊन येतात आणि गु-हाळ लावतात.
अशा ट्रोलला दुर्लक्षित करा असा आपुलकीचा सल्लाही मिळतो. कोण चुकलं तर त्याला व्यवस्थीत समज देणारेही आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रात निपुण, अनुभवसंपन्न लोक देखील मायबोलीवर आहेत.
मला संस्थळाला आभासी म्हणणं खटकतं. आपल्या रोजच्या आयुष्यात देखील आभासी प्रेम, गोड बोलणं , मैत्री या गोष्टी अनुभवाला येतात. जवळची माणसंच दगा देतात. मग अशी जवळीक, मैत्री जी फक्त स्वार्थापोटी असते ती आभासीच की.
मलाही केवळ असुयेपोटी इथे त्रास दिला गेलाय हे खेदाने नमूद करावे लागत आहे.

तुम्ही जर खरोखरीच मराठी आहात तर अन्न, वस्त्र, निवारा आणि इंटरनेट अशी चौथी (तिय्या नंतर) असेल तर त्यात मराठी फोरम (मग ते कोणतेही असेना) या गोष्टी तुमच्या आयुष्यात आल्याच पाहीजे.

गेले सहा महिने मला सोशल मिडिया वर वाळीत टाकण्याचा प्रयत्न जोरदार सुरु आहे, तसेच माझ प्रोफेशनल करीयर आणि business दोन्ही ही hamper करण्याचा प्रयत्न केला गेला. एखद्या व्यक्तीची पर्सनल information काढुन ती वेग वेगळ्या whats app गृप वर शेअर करणे, एखाद्या व्यक्तीला troll करणे हे सगळ कायद्याने गुन्हा आहे हे ह्या स्वतःला सुशिक्षित म्हणवणाऱ्या लोकांना कळू नये, ह्याच खरच दुःख होत आणि हे करतात ही फक्त दुसऱ्याने किंवा एका गृप ने सांगितले म्हणुन त्यांच्यावर विश्वास ठेवून हे अस वागतात ते ही सत्य परीस्थिती माहीत नसताना. आता वाटतं आपण तेव्हा त्या सोशल साईट वर लिहिणार नाही हा जो निर्णय घेतला तो एकदम योग्य होता, त्यामूळे सोमि वरचे खरे मित्र मैत्रिणी कोण हे अजुन चांगल्या तरहेने ओळखता आले. हे सगळ प्रकरण तडीस नेल्यावर ईथेच सविस्तर लिहीन .

एक चांगला धडा मिळाला की आपल्या प्रोफेशन ची मैत्री ह्या नात्या ने ही कोणाला फुकट मदत करू नये आणि माहिती ही अजिबात देऊ नये, तसेच ह्या पुढे अनोळखी व्यक्तिं ना कधीच कोणत्याही प्रकारे मदत करू नये. हा नियम मी माझ्यासाठी ठरवला.

अरेरे Sad
नंतर सविस्तर नक्की लिहा.

सामो खुप छान धागा..
मी पहिल्यादा इथेच आले. त्यामुळे बाळबोध भाबडेपणा होता. खुप चांगले किंवा खुप वाईट अनुभव नाही आले. (तितकी लोकप्रीयता नसल्याने असेल) त्याचं एक कारण माझा इथला वावर मर्यादित आहे हेही असेल आणि अजून सुरुवातच आहे (काही महिनेच झालेत).दुसरं असं...

मला कल्पनेपेक्षा सत्य अधिक भावतं... अगदी आतलं, मनातलं प्रकट होतांना ते वेगवेगळं स्वरुप घेतं. कधी ते सुखावह असेल, कधी दुखःद, कधी भयावह, कधी अकल्पित सुध्दा.. पण तरीही मी सत्याचा शोध घेते. त्यामुळेच असेल पण हे आपलं वाटत नाही. इथे (संस्थळावर) मन रमत नाही...हो पण लेखनाआडची व्यक्तीमत्व मला जास्त खुणावतात...मी इथे माणसं वाचते. लेखन हा चेहरा असतो. आणि त्या चेहऱ्याआडची माणसं मला दिसतात. म्हणून येते...प्रतिसाद आवर्जून वाचते. कधी लाहावंसं वाटलं तर लिहितेही पण ते उगाच, आपलं काहीतरी योगदान असावं (चाहत्यांप्रती) म्हणून असतं. त्यातही माझं खुप लाडकं असलेलं द्यायचं टाळते.
इथलं 'हितगुज' अगदी प्रामाणिक वाटतं मला. काही अपवाद वगळता आवडतंही...

स्वानंदासाठी सोशल मिडीयावर सोसल तेवढं लिहिले पाहिजे. लाईक आणि कमेंट ची अपेक्षा नकोच. प्रशंसा किंवा टीका दोन्हींना महत्त्व न देता गंगेच्या ओघाप्रमाणे पुढे जात राहिलं पाहिजे. प्रशंसा आणि नकारार्थी प्रतिसाद दोन्ही गोष्टींची मोजणी करू नये मग टोचणी लागत नाही.
सामोजी यू आर बेस्ट मराठी रायटर. आय लाईक युवर अॉल लिखाण. धन्यवाद!

काही लोकांचा सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न डोळ्यात पाणी आणून गेला. मिपावरील एका आयडीनं मिपा सोडली तेव्हा तेथील सदस्यांनी खरडफळ्यावर आनंद व्यक्त केला होता हे मला आठवलं.

माझी तर एक गम्मतच झालीय ह्याबाबतीत.
मी मिसळ पाव ची रेसिपी सर्च करताना मला मिसळ पाव. कॉम सापडले. ही साधारण 2009-10 ची गोष्ट होती.
मी तेव्हा मिपा सदस्य नव्हते (आताही नाहीय )पण मी मिपा खूप वाचलंय त्या काळात. पण तिकडे नंतर बराच गोंधळ झाला. मग अशीच कुठून तरी मायबोलीची ओळख झाली इकडेही सदस्य होण्याआधी बराच काळ वाचत होते. 9-10 महिन्यापूर्वी सदस्यत्व घेतले. कोणत्याही संस्थळावर मर्यादित वावर चं बरा.
स्वानंदासाठी लिहिणे आणि -ve प्रतिक्रिया देणाऱ्यांना ignore करणे ह्या गोष्टी पाळते.

स्वानंदासाठी लिहिणे आणि -ve प्रतिक्रिया देणाऱ्यांना ignore करणे ह्या गोष्टी पाळते.
नवीन Submitted by me_rucha on 26 December, 2019 - 03:41
>> आपण मॅच्युअर आहात. छान हेच धोरण ठेवा. शशिराम सारखे आयडी व त्याच्या नादाला लागणारे लगेच बा चा बा ची वर येतात.

काही आयडी फेकाडे लेख लिहून तोंडावर आपटले. आपलं तेच खरं अशा गप्पा मारणाऱ्या लोकांनी आयडी बदलला. तर काही हरीहरी करत जपमाळ ओढत बसलेत.

ॲमी , सस्मित ईथे सविस्तर लिहायला अजून काही महिने जातील, पण ईथे लिहायच हे अगोदरच ठरवले होत, त्यामूळे किती ही वेळ लागला तरी ईथे लिहिणार.

त्याने लिहिलेल्या लेखावर माझी छाप आहे.
>>> किती हा अहंकार? उद्या कुणाच्याही लिखाणाला माझी नक्कल केली असं म्हण्णार वाटते.

मी सुंदरा का यावेळी?
आहे अहंकार मला. तुला का त्रास होतोय बाबा? आम्ही आमचे पाहून घेऊ. शक्तीराम का कोण आहे तो, मला आवडतो. तुझा संबध नाही.

. तुझा संबध नाही.
Submitted by हरिहर. on 4 January, 2020 - 01:42
मीच होतो शशिराम, शक्तिवान, शक्तिराम, राणादा, खान, अमर, स्वप्निल, वाटाणे, चैतन्य रामसेवक, चक्रम माणूस, .,..... खूप खूप आठवत नाही.

मी एका वेळी एकाच संस्थळावर होतो / असतो.
ओर्कुटवर एकावेळी एकाच समूहात राहायचो, ऑर्कुटच्या शेवटच्या काळी मात्र दोन तीन समूहांवर वावर होता.
ऑर्कुट काळात थोडेफार लिखाण केले.
ओर्कुटवर खूप मित्र झाले, अजूनही भेटी गाठी होत असतात.
त्या नंतर आता फक्त मायबोलीवर असतो, पण आता विशेष ऍक्टिव्ह नसतो.

हो का
वा छान
मी आयूष्यात नेहमी जीव लावायला शिकलोय. जीव घ्यायची कधी वेळ आली नाही. तू ये कधीतरी. नाही गळा रेतला तर विचार. आयूष्यात कधी ईतके घाणेरडे विचार नव्हते आले. कुणीही असं, कसं वाटतं नेहमी घाण विचार करून? घरीही असाच वागतो का? बायकोला तुझी लाज नाही वाटत का?

Pages