गणितं..

Submitted by मन्या ऽ on 5 December, 2019 - 15:52

गणितं..

आयुष्याच्या पाटीवरची
गणितं माझी चुकली
चुका लपवण्यासाठी
मी ती पटापट पुसली
मनाचा शिक्षक आहे थोर
कडक शिस्तीचा
पुसलेली गणितं
परत परत विचारली

उत्तर देता येईनात
झाली पळता भुई थोडी
माझे मनच होऊनी मैत्र
आता माझी शिकवणी घेई
शिकवणी झाली चांगली
मास्तरांनी सांगितला
एक जालिम उपाय
जुनी शिदोरी पाठीला
नवे अनुभव बांध गाठीला
निर्धास्त होऊन जग
मी आहेच तुझ्या सोबतीला

उपाय कामी आला
अन् आनंदीआनंद झाला
नवे लोक नवी आव्हानं
असतील रोज रोज
कशाला दडायचे
आता थेट भिडायचे
मनसोक्त जगायचे
पण ह्यावेळी
गणितं सोडवताना
भान मात्र ठेवायचे!

(Dipti Bhagat)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जुनी शिदोरी
+ नवे अनुभव
(मनाचा शिक्षक हातचा)
---------------------------
उत्तर: मनसोक्त जगायचे

मस्त ......

गणित .....गणितं
आव्हान ......आव्हानं

सामो, पाभे, राजेंद्र , अज्ञा, यतीन, कुमारदा, क्युटी, नेहा, अप्पा, साद
प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद!! Happy Happy

@राजेंद्र देवी, बदल केला आहे. धन्यवाद! Happy

@ हरिहरजी, आपल्या प्रतिसादाच्या ओळीत ओळीत ‘गणीत’ या शब्दात पहिली वेलांटी हवी का?

(हळू घ्याल हि अपेक्षा.) Happy

अहो पाषाणभेद, हळू काय घ्यायचे, माझी प्रचंड बोंब आहे शुद्धलेखनाची. Lol णळाचा आणि बानाचा मी फार गोंधळ करतो. Lol
वेलांटी, उकार यात काही चुक असती तर मी सुचवली नसती पण येथे गणित या शब्दाचे अनेकवचन अभिप्रेत आहे म्हणून अनुस्वार हवाच असे वाटले. म्हणून आवर्जून सुचवले इतकेच.

अक्षय, वेडोबा, बोकलत प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद! Happy
बुन्नु, तुमच्या सुंदर प्रतिसादासाठी खुपसारे धन्यवाद! Happy

सर्व प्रतिसादक आणि माबोकरांना हे नवीन वर्ष सुखाचे, आंनदाचे आणि भरभराटीचे जावो! खुप खुप शुभेच्छा! Happy Happy