शाळेतून सुटलेल्या उफाड्याच्या पोरी

Submitted by बेफ़िकीर on 3 December, 2019 - 07:16

शाळेतून सुटलेल्या उफाड्याच्या पोरी
=====

शाळेतून सुटलेल्या
उफाड्याच्या पोरी
जपून जातात
आपापल्या घरी

भातुकली असो
स्वयंपाक असो
बाप नसो
आई नसो

रस्त्यातून जाताना
जपतात स्वतःला
निसर्ग दुर्लक्षित
कोंडतात मनाला

प्रियांका रेड्डी
होते कोणाचीही
मनी पोरींच्या
भीती याचीही

मला व्हायचे
असा रस्ता
मुली जातील
हसता हसता

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जाणिवा बोथट होत चालल्या आहेत
समाज विकृत होत चालला आहे
सुसंस्कृतपण हरवलेलं आहे
दुष्टांचे निर्दालन करण्या
अवतार हवा आहे

>>>>>>>ज्याच्या वरून तरी आरामात जाऊ शकते खूपच छान>>>>>> यही तो फरक है हम लोगोमे और कविमे.
आपण आरामात शब्द वापरतो तिथे हे सहज 'हसत हसत' असा सुरेख शब्द वापरुन जातात Happy
अचूक शब्दरचना!!

जाणीवपुर्वक हि कवीता वाचत नव्हतो. मनाला वेदना होतील याची धास्ती होती त्यामुळेच.
पण हिय्या करून वाचली.
खरोखर समाज कुठे चालला आहे? जन्मदात्या स्त्रीला अशा तर्‍हेने वागवले जाते !
वर राजेंद्र देवी म्हणत आहेत तेच खरे. आपण बोथट झालो आहोत.
धिक्कार असो अशा जगण्याचा.

(अवांतर: तो उफाडा हा शब्द अस्थानी वाटतो आहे. तेवढा कमी केलात तरी कवीतेच्या रसास्वादात काही फरक पडणार नाही. किंवा त्या जागी पर्यायी शब्द टाकावा हि आग्रहाची विनंती. उफाडा हा शब्द वेगळ्या अर्थाने येतो.)