Set your expectations high

Submitted by मधुवन्ती on 30 November, 2019 - 08:55

मैनु लेहंगा लै दे मेंहगा मर जाणेआ...ऐने पैसे दस तु कित्थे लैने जाणेआ
पंजाबी गाणं सुरु होतं....मला महागातला लेहंगा घेउन दे मेल्या नहितरी इतके पैसे घेउन तु जाणारेस कुठे! मित्रांवर पैसे उडवायला बरोब्बर पैसे आहेत तुझ्याकडे...माझी वेळ आली की पाकिट रिकामं?
अजुन एक गाणं नुकतच रिलिज झालंय....त्यात तर नुसतं लेहेंगा नाही ब्रांड पण आहे..ती पोरगी तर चक्क वादा च मागते, करले तु वादा पैला लैके दे प्राडा..... नाहीतर मी दुसरा कोणी शोधते जवळ सुद्धा येउ नकोस! सिधी बात नो बकवास!
असं म्हणतात न की पुरुषाच्या प्रेमाचा मार्ग त्याच्या पोटातुन जातो! गुजराती माणसाच्या प्रेमाचा मार्ग पोटातुन खिशात जात असावा,बायडी ने खमण ढोकळा किंवा उंधियु बनवलं की आ ले तारा माटे रोकडा! आपण बायको ला काय देतो गिफ़्ट म्हणुन? एखादी साडी किंवा दागिना ..... तो पण खोटा? इथे एखादा कर्सन भाय त्याच्या बायडीला म्हणतो जो तारा माटे आ पेला शेअर मा इन्वेस्ट करु छुं! अने रड नै तारा माटे सारी पण लै लेजे!
हे ऐकल्यापासुन मला असं वाटायला लागलं आहे की मराठी मुली स्पेशली जरा जास्तच भावनिक होवुन हा मॉनिटरी बेनिफिट घालवतात! काय तर मुलगा म्हणतो मी तुझ्यावर कायम असंच प्रेम करत राहिन...तुझ्यासाठी चंद्र तारे आणेन....अरे भैताडा! तुला चार पावलं चालता येत नाही, सतत बुडाखाली गाडी लागते आणि गोष्टी करतो चंद्र तार्यांच्या!
तेरे बस की बात नहीं!
बंगाली माणसं ह्या अशा चंद्र चांदण्यांच्या फ़ंदात पडत नाहीत...मला का माहित नाही असं वाटतं की बंगाली जन्मत: हुशारच असतात...असे झाडले की ४ -५ अर्थ तज्ञ निघतात,तसे ते स्वत:ला पण शहाणे समजत असतातच. म्हणुन मला काय वाटतं की दोघं कायम रबींद्र संगीत किंवा दिदी किंवा भारताच आर्थिक धोरण डिस्कस करत असतील....रोशोगुल्ला आणि माछेर झोल ने ह्यांचं पोट शिगोशिग भरतं.
ह्यांच्याकडे पण नो नॉनसेन्स हा!
म्हणजे बंगाली बायका अशी अपेक्षा करत नसतील की मला साडी पाहिजे किंवा दागिने,त्या तेवढ्या समर्थ असतात,तुम्हाला जर बंगाली मुली चं ह्रुदय जिंकायचं असेल तर तुम्हाला संगीत, नृत्य वगैरे किंवा क्रिकेट आणि फुटबॉल या विषयांवर तासन तास बोलता यायला हवं!
फ़िरायला घेउन जायचं असेल तर शॉपिंग ला नाही, शांतीनिकेतन किंवा सुंदरबन्स....जर गोष्टी फ़ारच पुढे गेल्या असतील तर दार्जिलिंग चा पण विचार करायला हरकत नाही! बंगाली पुरुषांना आमी तोमाके भालो बाशी म्हणायला आलु आणि भात पुरत असावा!मासे हे भातामधेच समाविष्ट असतात.
तिकडे दक्षिणेकडे वन्ली गोल्ड आणि गोल्डन गोल्ड वनली!व्हाइट गोल्ड,एक ग्रॅम वगैरे अशा खोट्या गोष्टींवर ह्यांचा विश्वासच नसतो,सोनं सोनेरी रंगाचं असायला हवं आणि एका दागिन्याचं किमान वजन १० तोळे तरी असायला हवं....ह्यांना प्रत्येक आणि कुठल्याही प्रसंगी गोल्ड चालतं,साड्यांमधे वन्ली कांजीवरम!
लहानपणी आपण आपल्या बाळाला खेळणी काय देतो? खुळखुळा? माधव लहान असताना मला एक सल्ला असा मिळाला होता की खुळखुळा द्यायचा नाही नाहितर जन्मभर तो पोर खुळा होवुन खुळखुळे वाजवत बसेल.....
पंजाबी बहुतेक त्यांच्या मुलांना खेळायला पाळण्यावर टांगलेले ट्रक्स,जीप्स किंवा निदान बाइक्स लावत असतील आणि मुलींच्या पाळण्यांवर लिपस्टिक,रुज,पर्सेस वगैरे
तर मराठी मुलींनो शहाण्या व्हा....do not settle for गजरा किंवा गुलाब! Set your expectations high!

माझे पंजाबी, बंगाली आणि गुजराती मित्र मैत्रिणी मला मोठ्या मनाने माफ़ करतील अशी आशा करते!
मधुवंती गोडसे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

> हे ऐकल्यापासुन मला असं वाटायला लागलं आहे की मराठी मुली स्पेशली जरा जास्तच भावनिक होवुन हा मॉनिटरी बेनिफिट घालवतात! > छे छे. त्या पुण्यामुंबईत स्वतःचा २bhk आहे का विचारतात मुलांना. लेहेंगा वगैरे काय छुटपुट झालं.

हो ग ॲमी अगदी खरं...आणि स्वतः अगदी कुठूनही असल्या तरी मुलगा मात्र पुण्या मुंबईतला च हवा असतो त्यांना!

मी काय म्हणते जे काही हवंय त्याच्या साठी नवरा / boyfriend ची कशाला वाट पहायची? आपणच आपलं करून/ घेऊन मोकळं व्हावं, स्वतः साठी expectations high सेट करायच्या.

मी काय म्हणते जे काही हवंय त्याच्या साठी नवरा / boyfriend ची कशाला वाट पहायची? आपणच आपलं करून/ घेऊन मोकळं व्हावं, स्वतः साठी expectations high सेट करायच्या. >> असं कसं चालेल. एका राज्यातली राज्यकन्या, दुसर्‍या राज्यातली होऊ घातलेली महाराणी , तिने सुद्धा ' मज आणून द्या तो हरिण अयोध्या नाथा' म्हटले होते ना ? मग एकविसाव्या शतकातल्या, शिकल्या सवरलेल्या, प्राडा वगैरे माहित असलेल्या मुली कशा काय नवरा किंवा बॉयफ्रेंडवर विसंबून रहाणार नाहीत !

Medha+1.

राजसी +१

> हे ऐकल्यापासुन मला असं वाटायला लागलं आहे की मराठी मुली स्पेशली जरा जास्तच भावनिक होवुन हा मॉनिटरी बेनिफिट घालवतात! > छे छे. त्या पुण्यामुंबईत स्वतःचा २bhk आहे का विचारतात मुलांना. लेहेंगा वगैरे काय छुटपुट झालं.>>>>
अमेरिकेला जायची संधी आहे का? चार चाकी आहे का? घरी कोण कोण असतं ? आई वडिल दुसरिकडे राह्तात का? कधी आणि कितिवेळा येता घरी? माझे मित्र घरी येतिल त्यात नाक खुपसायच नाही? तुझे मित्र मैत्रिण शक्यतो कमी यावेत घरी इ इ

मज्जा आली वाचायला. Lol
म राठी मुलीच्या अपेक्षा ऑलरेडी हाय आहेत, त्यात लेहेंगा , सोने वगैरे दु य्य्म , तिय्यम्म स्थानावर येतात. Wink

ह्यॅ, गुची, प्राडा, ब्लॉक, पैठण्या, नथी नि दागिने नि फारेन ट्रिपा, माझ्या मी घेऊ शकते.

How will you top this up? ते सांग. नाय तर गेटच्या बाहेर सुटायचं.

तो देणार ह्याची वाट बघत बसले तर झालंच मग.