महाराष्ट्रातील चाणक्य...शरदचंद्र पवार

Submitted by सचिन पगारे on 30 November, 2019 - 05:57

एखाद्याने राजकारणात जर काही मुत्सद्दीपणा दाखवला की त्याला 'चाणक्य' असे समजण्यात येते. अर्थात चाणक्य हे पात्र खरे की खोटे यात न जाता जर ह्या उपाधीचे खरे हकदार जर महाराष्ट्रातील राजकारणात कुणी असतील तर ते शरद पवार साहेब यात कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही

निवडणुकीपुर्वी राज्यात राष्ट्रवादीची स्थिती ही अत्यंत कमजोर होती. भाजपाने पक्ष फोडायचा सपाटा लावला होता. जवलपास २५ मातब्बर नेते पक्ष सोडुन गेले. स्थानिक नेत्यांनीही हवेचा रोख बदलुन भाजपात प्रवेश केला.

त्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस ह्यांनी पवारांना हिणवण्याचे काम सुरु केले. पवारांचे राजकारण संपुष्टात आले आहे, समोर पहिलवानच दिसत नाही तर कुस्ती कुणाशी खेळायची, राज्यात विरोधी पक्ष अस्तित्वातच रहाणार नाही,विरोधकांना ५० जागा जिंकणेही मुश्किल आहे अशी धुळवड सुरु होती. ही जी धुळवड सुरु आहे ती पवार साहेब शांतचित्ताने बघत होते.नंतर ईडीप्रकरण झाले त्यातुनही काही निष्पन्न झाले नाही. पवारांना नामोहरम करण्यासाठी दिल्ली हुन शहा, मोदी आले. शहांनी पवारांच्या राजकारणातील योगदानावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले मोदीही आपया नेहमिच्या 'मित्रो' ह्या शैलित पवारांवर तुटुन पडले.भाजपने आपली सर्व शक्ति अगदी सम्राट व चाणक्यही पवारांविरोधात प्रचारात उतरवले.पवारांचे राजकारण संपुष्टात आलेय ह्या भ्रमात ते होते.वास्तविक पहाता फडणविसांनी टोकाची टिका करायला नको होती त्यांचे वय ४९ तर पवारांचा नुसता राजकारणाचा अनुभव हा ५० वर्षाचा आहे हे ते विसरले. दिल्लिश्वरांच्या मदतीने आपण सहज विरोधकांचा पाडाव करु ह्या भ्रमात ते होते. शहा जे पवारांचे योगदान विचारत होते ते आता अवघ्या ५-६ वर्षापुवी देशाच्या राजकिय पटलावर आले महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी त्यांच्याकडुन गैरसमज होणे हे स्वाभाविकच होते.

नंतर मात्र पवारांनी सर्व सुत्र हाती घेतली. वाघ हा गुहेत असतो तो पर्यत जंगलात शांतता असते तो जेव्हा बाहेर येतो तेव्हा मात्र धुम ठोकण्याशिवाय पर्याय नसतो. हल्ला करताना वाघ समोर चाणक्य आहे कि सम्राट याचा विचार करत नाही जबर जखमी करतो. पवारांना जखमी करणारे ह्या भ्रमात होते की वाघ म्हातारा झालाय, जखमी झालाय तो काय करेल पण पवार हे मनात एक निश्चय घेउन बाहेर पडले व त्यांनी जी कमाल केली ती सार्या महाराष्ट्राने पाहिली. शिकारी स्वताच शिकार झाले. कुस्तिला पहेलवान समोर दिसत नसणार्या फडणविसांना आपली पाठ कधी जमिनिला टेकलीय व डोळ्यासमोर तारे चमकलेत हे समजलेच नाही.

निकालाचे आकडे समोर आले नि पवारांनी खरा खेळ सुरू केला. शिवसेनेतील अस्वस्थता ते जाणुन होते. आपल्याकडे असलेल्या संख्याबळाचा खुबिने वापर करण्यात पवार वाकबगार आहेत मग ते कमी असो वा जास्त. २०१४ साली भाजपाला न मागता पाठिंबा देउन त्यांनी शिवसेनेची बार्गेनिंग पाँवर कमी केली होती. ह्या वेळेस मात्र शिवसेनेतील अस्वस्थता हेरुन आम्ही विरोधी पक्षात बसणार असे सांगुन त्यांनी शिवसेनेला मोकळे रान करुन दिले. शिवसेनेनेही ह्या मोकळ्या रानाचा वापर करत भाजपला सैरावरा पळवले.नंतर महत्वाचा मुद्दा होता तो काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी यांंचे पांठिंब्यासाठी मन वळवणे यातही पवार यशस्वि झाले.
नंतर अजित पवार भाजपात जाणे, रात्रीच्या काळोखातला मुख्यमंत्री शपथविधी हे सारे प्रकार झाले. महाराष्ट्रातील राजकारणाचा प्रकार बघुन थिजुन गेलेल्या त्यांच्या चाणाक्यांना पुन्हा कंठ फुटला. सर्वत्र काहीही न करता त्यांची चाणक्य म्हणुन गणना होउ लागली. मोटाभाई ने भारी गेम किया असे मेसेज सोशल मिडियावर फिरु लागले.

पण काळोखातल्या शपथेला ८० तास होण्याअगोदरच पवारांनी बाजी पलटवली.दिल्लितल्या चाणाक्यांच्या हाती बाँलपेन तसाच राहिला पण रिफील पवारांनी काढुन नेली. ८० तासाचे मुख्यमंत्री बनण्याची नामुष्कि फडणविसांवर आली, म्हातार्या पहिलवानाचा फटका त्यांच्या सकट पुर्ण भाजपला बसला. महाराष्ट्रात विरोधी पक्ष रहाणार नाही म्हणणार्या माजी मुख्यमंत्र्यावरच विरोधी पक्षनेता बनण्याची पाळी आली.दिल्लितील चाणक्य निती अनिती सारख्या अपरिचित गोष्टींवर न्युजमध्ये रुदाली करु लागले.

तर अशा ह्या महाराष्ट्रातील राजकारणाच्या पितामहाला दिर्घायुष्य लाभो नि महाराष्ट्राची सेवा व रक्षण त्यांच्याकडुन होवो हीच अपेक्षा..

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

शिवसेना बाहेर पडली हाच खरा टर्निंग पॉईण्ट होता. त्याचे श्रेय संपूर्णपणे मोदी, शहा आणि फसवणीस या त्रयीला जाते.

राऊतांची धुवांधार बॅटींग आणि काँग्रेसने दिलेला न्यायालयीन लढा यामुळे सत्तांतर झाले. अन्यथा फडणवीस सरकारने बहुमत सिद्ध केले असते.

शिवसेना बाहेर पडली हाच खरा टर्निंग पॉईण्ट होता. त्याचे श्रेय संपूर्णपणे मोदी, शहा आणि फसवणीस या त्रयीला जाते.

पूर्णपणे सहमत.

भाजपने केलेल्या गंभीर चुकांमुळे सेनेला संधी मिळाली. त्यामागे पवारांचा दुरूनही संबंध नाही.

वीस-पंचवीस वर्षांपूर्वी पवार साहेबांविषयी एक ऐकले होते "एखाद्याला राजकारणात वर आणायचे असेल तर ते पवारांना एखाद वेळेस जमेल अथवा नाही जमेल. पण एखाद्याला त्यांनी संपवायचे ठरवले असेल तर ती व्यक्ती (राजकारणातून) संपवल्याशिवाय पवार शांत बसत नाहीत". आणि याचा प्रत्यय अनेकांना वेळोवेळी आला आहे. म्हणूनच पवारांशी पंगा घेणे भल्याभल्यांना खूप महागात पडले आहे. त्यातल्या त्यात सुरेश कलमाडी त्यांना थोडे जड गेले. पुण्यात कलमाडीना तेच घेऊन आले. तत्कालीन काकासाहेब गाडगीळ यांना आव्हान उभे करण्यासाठी. कलमाडींच्या मदतीने काकासाहेब गाडगीळांना पवारांनी गारद केले व पुण्यावर वर्चस्व मिळवले. पण कानामागून येऊन कलमाडी तिखट झाले व नंतर पवारांनाच डोईजड होऊन बसले. पण हरतील तर पवार कसले. कलमाडींचे प्रस्थ संपवण्यात अनेक वर्षांनी पवार यशस्वी झाले. आज कलमाडी कुठे आहेत हे सुद्धा कोणास ठावूक नाही.

राजकीय शत्रुत्व कितीही असले तरी व्यक्तिगत स्तरावर बाळासाहेबांचे आणि पवार साहेबांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. टीका जरूर केली पण बाळासाहेबांनी कधीही त्यांच्याशी पंगा घेतला नाही. घेतला असता तर आजचे चित्र दिसले नसते. याचे श्रेय बाळासाहेबांनी दाखवलेल्या परिपक्वतेला सुद्धा जाते. आजच्या अनेक नेत्यांना पवारांनी लहानपणी अंगाखांद्यावर खेळवले असेल. अशा नेत्यांनी पवारांना इडीची भीती दाखवून संपवण्याचा जो प्रयत्न केला व अर्ध्या हळकुंडाने पिवळे होत "अजित पवार चक्की पिस्सिंग पिस्सिंग" असले काहीबाही म्हणत "बालिश बहु बायकांत बडबडला" चा प्रत्यय आणून दिला त्या नेत्यांना संपवणे पवारांच्या डाव्या हातचा मळ होता. त्याचा प्रत्यय त्यांनी आणून दिला.

फक्त विशेष नमूद करण्यासारखे एकच आहे कि हे सगळे डावपेच जे ते तीस चाळीस वर्षांपूर्वी करत असत ह्या वयात सुद्धा ते करणे ह्यासाठी खूप इच्छाशक्ती व मजबूत जीवनशक्ती आवश्यक आहे. त्या जोरावरच ह्या जाणत्या राजाने कॅन्सरवर आणि विरोधकांवर ह्या वयात सुद्धा मात केली. खूप शिकण्यासारखे आहे. सलाम!

काकांचा डाव्या हातचा मळ 52 आमदारांच्या जीवावर आहे हे विशेष ! पूर्ण बहुमताचे आमदार स्वतच्या जीवावर निवडून आणण्याची कुवत व लायकी त्यांच्यात कधीच नव्हती. पण भोक मिळालं की त्याचं भगदाड बनवायचं त्यांचं कसब वाखाणण्यासारखे आहे.
फक्त काड्या घालायला संधी मिळाली पाहिजे, जी मागील 5 वर्षांत मिळाली नव्हती. पण जातीपातीच्या राजकारणा वरुन प्रयत्न चालू होते.

पवारांकडे जवळपास मागच्या एवढ्याच जागा होत्या. ते काही करू शकत नव्हते.
नागपुरकरांचा सत्ता हितात ठेवायचा हेका अंगाशी आला. आणि सेना एवढे सगळे सोडेल असं कुणालाच वाटलं नव्हतं. राऊतांचा १७५चा आकडा हा एकावेळी अतिशयोक्ती वाटत होता.

आता कुणाच्या भोकाचं भगदाड केलं?

फडनविसच्या की शहाच्या ?

(भोक म्हणजे तोंड)

नवीन Submitted by BLACKCAT on 30 November, 2019 - 19:48>>>

बटबटीत डोळ्यांच्या कागलकराच्या Lol

>>तर अशा ह्या महाराष्ट्रातील राजकारणाच्या पितामहाला दिर्घायुष्य लाभो नि महाराष्ट्राची सेवा व रक्षण त्यांच्याकडुन होवो हीच अपेक्षा..<<. +१
सुप्रिया सुळे यांना डिसरिगार्ड करण्याचा हेतू नाहि, पण एव्हाना त्यांना एक चांगला होतकरु उत्तराधिकारी मिळायला हवा होता...

पवारांना चाणक्य वगैरे ठरविल्याचे वाचून हसू आवरले नाही. राजकारणात ५०+ वर्षे काढूनही राज्यात कधीही २५ टक्के जागा सुद्धा मिळाल्या नाहीत. २००४ मध्ये योगायोगाने सर्वाधिक (७१) जागा मिळूनही मुख्यमंत्रीपद मिळवता आले नाही. केंद्रात कधीही महत्त्वाचे खाते मिळाले नाही. त्यातल्या त्यात महत्त्वाचे खाते १९९१ मध्ये फक्त २० महिने मिळाले होते, पण २००४-२०१४ या काळात सामान्य खाते मिळाले. कायमच सोनिया गांधींंसमोर झुकावे लागले. आज महाराष्ट्रात भाजप सत्तेत नाही हे भाजपच्या स्वत:च्या चुकांचे फळ आहे. त्यामागे पवारांचा दुरूनही संबंध नाही. पवार स्वत: मोदी-शहांना भेटले होते व स्वत:च्या मुलीला केंद्रात मंत्रीपद व राज्यात फडणवीसांऐवजी वेगळा मुख्यमंत्री या अटींवर ते भाजपला पाठिंबा द्यायला तयार होते. एकंदरीत या तथाकथित चाणक्याची धाव अत्यंत मर्यादित आहे.

पवारांनी राष्ट्रिय पक्षातुन फुटून स्वताचा पक्ष काढला नि ते ५० ते ६० जागा जिंकुन येतात. पण त्याच संख्येवर ते महाराष्ट्राच्या राजकारणावर नियंत्रण ठेवतात. ममता बँनर्जींना ही किमया प.बंगालमध्ये साधता आली आहे त्या पुर्ण बहुमताने निवडुण येतात.पण एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे उद्या फडणविस किंवा शहाने स्वताचा पक्ष काढल्यास ते किती जागा निवडुण आणतील खर म्हणायच झाल्यास ते स्वताही निवडुण येणार नाहीत. पवार हे लोकनेते आहेत तर फडणविस, शहा हे पक्षाने दिलेल्या मोठ्या जबाबदारीमुळे मोठे झालेले नेते आहेत उद्या जबाबदारी काढली तर ते पुन्हा सामान्य रुपात येतील.

या तथाकथित चाणक्याने कृृृृषी मंत्री पदावर सर्वात जास्त काळ काढला. त्या दरम्यान महाराष्ट्रातील शेतकर्याच्या आत्महत्या कमी झाल्या नाहीत. उलट सहकारी तत्वावर सुरु केलेले साखर कारखाने आपल्या नातेवाईकात वाटुन टाकले.
एकंदरीत या तथाकथित चाणक्याची धाव अत्यंत मर्यादित आहे.
https://youtu.be/0aEUY7fS-Pg

Biggrin

माथाडींचे प्रॉविडंट फंडाचे पैसे ठेवलेली बँकही डुबली. त्यांचा सपोर्ट होता. परवा पुन्हा एकदा पैसे काढून नेल्याची बातमी आहे.

पवारांनी राष्ट्रिय पक्षातुन फुटून स्वताचा पक्ष काढला नि ते ५० ते ६० जागा जिंकुन येतात. पण त्याच संख्येवर ते महाराष्ट्राच्या राजकारणावर नियंत्रण ठेवतात.

Submitted by सचिन पगारे on 30 November, 2019 - 23:40 >>

मग उद्धवलाही चाणक्य म्हणून टाका. २०१४ साली भाजपविरुद्ध लढून त्याने 68जागा आणलेल्या. त्यावेळी राकोंग्रेस ४१ वर होती. आताही शिवसेनेच्या जागा रा काँग्रेस पेक्षा जास्तच आहेत.

तिथे उत्तरप्रदेशात मायावतीला जे जमलं ते पवारांना महाराष्ट्रात जमत नाही ही वस्तुस्थिती आहे.

मग उद्धवलाही चाणक्य म्हणून टाका. २०१४ साली भाजपविरुद्ध लढून त्याने 68जागा आणलेल्या. त्यावेळी राकोंग्रेस ४१ वर होती. आताही शिवसेनेच्या जागा रा काँग्रेस पेक्षा जास्तच आहेत.)))))))) उध्दवला चाणक्य म्हणता येणार नाही ते राजकारणातील प्रामाणिक व सरळसाधे व्यक्तित्व आहे. ते प्रथमच एवढे आक्रमक झाले त्याला कारणिभुत भाजपचा खोटेपणा आहे असे ते म्हणतात. जास्त जागा येणे म्हणजे चाणक्य असे नाही तर कमी जागा येउनही आहे त्या रिसोर्सचा हुशारीने वापर करणे म्हणजे चाणक्य.

तिथे उत्तरप्रदेशात मायावतीला जे जमलं ते पवारांना महाराष्ट्रात जमत नाही ही वस्तुस्थिती आहे.))))))) प्रत्येक प्रदेशातील राजकिय परिस्थिती वेगळी असते.आज बसपा केंद्र सरकारविरुध्द आवाजही काढताना दिसत नाही तर पवारांनी भाजपला महाराष्ट्रात अक्षरक्षा दे माय धरणी ठाय करुन सोडले आहे.चेहर्यावर गंभिर तत्ववेत्याचे भाव आणुन राज्याराज्यात निवडणुकी दरम्यान फिरणारे शहा महाराष्ट्रात फिरकलेही नाहीत त्यांच्या नकली हुशारीचा महाराष्ट्रात पाडाव झाला आहे.

आज बसपा केंद्र सरकारविरुध्द आवाजही काढताना दिसत नाही तर पवारांनी भाजपला महाराष्ट्रात अक्षरक्षा दे माय धरणी ठाय करुन सोडले आहे >>> तर मग मोदी आणि शहा यांच्यासोबत दोन दोन तास कसल्या चर्चा करत बसले होते पवार ? एकदा शब्द दिल्यानंतर पुन्हा यांच्याशी चर्चा करण्याचे कारण काय ? भाजपच्या बंडखोरांना निवडणुकीत रसद पुरवण्याचे कारण काय ? त्या बदल्यात भाजपनेही राष्ट्रवादीला काही ठिकाणी मदत केल्यानेच राष्ट्रवादीच्या जागा वाढल्या. यामुळेच सेनेने काडीमोड घेतला.

भाजपसोबत सरकार बनवल्यास एकूण १९ मंत्रीपदे आणि केंद्रात कृषीमंत्रीपद, फक्त अजित पवार आल्यास १२ मंत्रीपदे अशी ऑफर होती. मात्र उघड गेल्यास मुसलमान मतदार दुरावेल म्हणून हे नाटक खेळले गेले.

संजय राऊत आत्ता बोलणार नाहीत कारण हात दगडाखाली अडकले होते. पण अजितदादांचे बंड झाल्यावर उद्धव ठाकरे आणि राऊत हे दोघेही राष्ट्रवादीच्या हॉटेलात तळ ठोकून होते. भारतीय कामगार सेनेने राष्ट्रवादीचे आमदार पकडून आणले, ते कोणत्या हॉटेलात आहेत याची माहिती दिली. यामुळे पवारांचा नाईलाज झाला आणि बंड फसले.

पवारांवर मराठा समाजही विश्वास ठेवत नव्हता. अजितदादा पवारांनी जातीचे राजकारण सुरू केल्यावर हा पक्ष मराठाकेंद्रीत झाला. मात्र निवडणुकीच्या काळात मुस्लीम मतदाराला शरद पवारांनी चुचकारले. भाजपची भीती घालून आपल्याकडे वळवले. दलितांनी भाजपच्या भीतीनेही राष्ट्रवादीला सपोर्ट करायला नाकारल्याने पवारांचा जनाधार घटला आहे. ईडीच्या नोटीशीनंतर पवार उसळले वगैरे काही झाले नाही. भाजपसोबत छुपा समझौता होता म्हणूनच भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांन महाराष्ट्रात भाजप वि. पवार अशी निवडणूक लढवली.

>>> पवारांनी राष्ट्रिय पक्षातुन फुटून स्वताचा पक्ष काढला नि ते ५० ते ६० जागा जिंकुन येतात. पण त्याच संख्येवर ते महाराष्ट्राच्या राजकारणावर नियंत्रण ठेवतात. >>>

कसलं डोंबलाचं नियंत्रण? २०१४-२०१९ या काळात कोणतं नियंत्रण होतं? २०१४ मध्ये भाजपला पाठिंबा द्यायचा प्रयत्न करून पाहिला, पण तो पूर्ण फसला. भाजपने चातुर्याने पवारांच्या न मागता दिलेल्या पाठिंब्याचा उपयोग करून सेनेला शरण आणले व पवारांना हातात भोपळा मिळाला. आता भाजप सत्तेबाहेर आहे त्यामागे पवारांचे चातुर्य नसून भाजपच्या चुका कारणीभूत आहेत. हे एवढे चतुर व नियंत्रण ठेवणारे होते तर २००४ मध्ये सर्वाधिक जागा मिळूनही यांचा मुख्यमंत्री झाला नव्हता. केंद्रात १० वर्षे सत्तेत असूनही महत्त्वाचे मंत्रीपद मिळवता आले नाही. याउलट खूप कमी जागा मिळूनही मायावती, कुमारस्वामी, नितीश हे मुख्यमंत्री झाले. गोवा, मणिपूर अशा राज्यात कमी जागा मिळूनही भाजपचा मुख्यमंत्री झाला. हेच खरे चाणक्य!

वास्तवात 'चाणक्य' हे पात्र इतिहासात होउन गेले की नाही याबद्दल काही कल्पना नाही.
लेखात चाणक्य हा शब्द फक्त बोलीभाषेत रुळला गेला असल्याने वापरला आहे. 'चाणक्य' हे विशेषण मुख्यता राजकारणातील हुशार, मुत्सद्दी व्यक्तिला लावले जाते.

पवारांनी कारखाने वाटले, शेतकरी आत्महत्या ते क्रुषिमंत्री असताना झाल्या, माथाडींची बँक,
भारतीय कामगार सेनेने राष्ट्रवादीचे आमदार पकडून आणले,कुमारस्वामी, मायावति, भाजपचे साटलोट मुख्यमंत्री हेच खरे चाणक्य, पवारांचे चातुर्य नव्हे भाजपच्या चुका असे विविध मुद्दे प्रतिसादात विविध जणांनी मांडले.

पण लेखाचा उद्देश हा पवार हे एकदम पाँवरफुल आहेत, २८८ पैकी २०० निवडुण आणायची त्यांची क्षमता आहे ते एकदम राजकारणातले संत आहेत हा नसुन ते राजकारणातील मुत्सद्दी आहेत हा आहे. राजकारणात ५० वर्ष काढणे तेही सातत्याने चर्चेत राहुन, महाराष्ट्रातील सत्तेचा केंद्रबिंदु रहाणे, सर्व पक्षात उत्तम संबध असणे ही मोठी उपलब्धी आहे.
शिवसेनेने भाजपला धोबिपछाड दिला कारण त्यांना पवारांचा सपोर्ट होता, काँग्रेस राष्ट्रिय पक्ष आहे शिवसेनेशी युती करण्याबाबत ते दोलनामय होते पण ते ही आपल्याला सपोर्ट करतील हा विश्वास शिवसेनेला होता तो पवारांमुळेच. सर्व पक्षात संबंध असणे व सर्वांचा आपल्या सोयीने वापर करण्यात पवारांचा हातखंडा आहे. त्यामुळे तेच महाराष्ट्रिय राजकारणातले चाणक्य आहेत.

Pages