कवी व्हावं का बाबा

Submitted by सचिनकिनरे on 29 November, 2019 - 11:58

कवी व्हावं का बाबा,
पाठीचा घोडा करून,
एक रपेट दयावी बाळाला,
एका पापीच्या, झप्पीच्या बदल्यात,
की मोजावे लाईक्स फेसबुक वर...

कुशीत घेऊन बाळाला,
थोपटत गाण म्हणत,
पहिलं कोण झोपी जावं,
की बसावं, एक गहन विषय घेऊन...
काही सुचत का बघत...

खेळताना लुटुपुटूच्या लढाईत,
हरून जावं की,
जिंकावे ऑफिसमध्ये
प्रमोशन इन्क्रीमेंटच्या लढाईत...

गोष्ट सांगावी एखादी
सुपर हिरोची,
त्यातला सुपर हिरो,
आपणच बनावे,
की झोपून जावे,
उद्याच्या ओझ्याची चिंता करत...

सायकलच्या मागे धरून,
न धरल्यासारखं करावं,
थोडस अंतर ठेवून कायम
त्यांच्यामागे सावलीसारखं,
आयुष्यात मोठं होताना,
हवं तेथे साथ देत,
की धावावं आपलं आपण..रॅट रेस मध्ये
आणि तेच शिकवावं..

मुळात असा प्रश्नच नसतो आईसाठी...
आई पहिली आई असते,
मग दुसरं तिसरं उरलं राहील तर,
हल्ली कधी कधी नसत बरं अस,
आई जाते ऑन साईट विदेशात कधी कधी,
बाळ असत आजीकडे,
विडिओ कॉल वर आईशी बोलत..

कवी व्हावं का बाबा,
का करत राहावी कसरत,
तारेवरची...

सचिन किनरे
29 नोव्हेंबर 2019

Group content visibility: 
Use group defaults