दत्त बडवीत होते

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 28 November, 2019 - 10:36

दत्त बडवीत होते

***************

सुटलाच गंध शेवटी

ते झाकले प्रेत होते

उडणे कफन हे तर

केवळ निमित्त होते

का मारतोस चकरा

तिथे कुणीच नव्हते

होणार शेवटी काय

तुजला माहित होते

नेहमीच आड वाटे

फसवे भूत असते

करण्यास वाटमारी

सारे सभ्य जात होते

जग गोजरे दुरून

आत जळत असते

देण्यास मिठी तू जाता

मूर्ख फसगत होते

रे रडसी तू कशाला

झाले ते होणार होते

तू मान मनी सुख की

दत्त बडवीत होते

विक्रांत जग असे का

सांग कधीच नव्हते

ओपून उरात खंजर

मित्रही हसत होते

अजून प्याला रिता हा

मागतो विश्वास खोटे

त्या सजल्या बाटलीत

विष काळकूट होते

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सामो ,
आमच्या लहानपणी आम्हाला आई बडवायची म्हणजे मारायची. त्याने दु:ख तर व्हायचे पण त्या मागील हेतू शुद्ध असतो त्यामुळे ते सुख कारकच होते

ओह कळले आता.
_____________________
असाच हा एक श्लोक -

चित्ते कृपा समरनिष्ठुरता च दृष्ट्वा,
त्वय्येव देवी वरदे भुवनत्रयेपि||

म्हणजे रणांगणावर अतिशय (समरनिष्ठुर) अशी तु भासायमान होत असलीस तरी तुझ्या हृदयी केवळ कृपा आहे - हे वरदे, अशी विरोधाभास असलेली जगात तू एकमेव आहेस.
अर्थात देवी हे जाणून होती की तिच्या हस्ते , तिच्या शत्रास्त्रांनी जे राक्षस मरतील त्यांना मुक्तीच मिळेल पण तरीही त्यांचे कल्याणच व्हावे या आंतरीक अतीव कृपामय हेतूने तिने तरीही शस्त्र उचलले.

डॉ.काका
कवितेच्या शेवटच्या चार पंक्तिचा अर्थ मला नीटसा समजला नाही..
बाकी कविता सुंदरच! Happy

अजून प्याला रिता हा
मागतो विश्वास खोटे
त्या सजल्या बाटलीत
विष काळकूट होते

या आयुष्याचा प्याला रिकामा आहे ,इतका की त्याला खोटे प्रेम ही चालेल .
त्याचे जीवन सजलेली सुंदर बाटली आहे . पण आतुन तो इतका जळलाय की काळकुट विष झालाय