'रंग पाखरू'

Submitted by शशि.. on 28 November, 2019 - 08:58

'रंग पाखरू'

रंगात रंगुनी जावे
स्वप्नात दंगूनी जावे
खेळ खेळत रंगांचा हा
मन 'रंग पाखरू' व्हावे..!

गवताची पाती हसती
दवबिंदु त्यावर वसती
दवबिंदुनि ही हिरवळीवर त्या
'मोत्यांचे' रंग धरावे...
खेळ खेळत रंगांचा हा
मन 'रंग पाखरू' व्हावे...! १

अवकाशी इंद्रधनुने
रंगांसी उधळत जावे
सप्तरंगांची होता उधळन
'पावसाने' निवांत न्हावे...
खेळ खेळत रंगांचा हा
मन 'रंग पाखरू' व्हावे...! २!!

फुला-फुलांस सांगत फिरते
फूल पाखरू जाऊन कानी
तव रंगांचे शिंपण थोडे
मज पंखांवरी करावे...
खेळ खेळत रंगांचा हा
मन 'रंग पाखरू' व्हावे...! ३!!

रंग हर्षाचे पसरावे
दु:खाचे रंग विसरावे
सखे-सवंगडयांसवे जमता महफील
'रंगपाखरू' मनी फुलावे...
खेळ खेळत रंगांचा हा
मन 'रंग पाखरू' व्हावे...! ४!!

~ शशि..

Group content visibility: 
Public - accessible to all site users