आठवणीतला सुवास...

Submitted by पाजू on 27 November, 2019 - 07:38

नमस्कार मायबोली कर, हे माझ्या आयुष्यातील आणि मायबोलीवरील पहील लिखाण,
दिग्गजान्ना आणि रसिकन्ना नम्र विनन्ती.... शिकाऊ आहे, साम्भाळुन घ्या.. आदरमोद..
.
.
.
अगदी लहानपणापासून आपल्या ओळखीचा असा एक सुवास असतो, आई / आजी जरी जवळुन गेली तरी तिच्या साडीचा कोरा करकरीत सुवास, पुजा केल्यावर तिच्या हाताला येणारया तुपाचा, धुपाचा, अष्टगन्धाचा सुवास, ती ने केलेल्या भाजीचा किव्वा गोडाचा वास....(सारख सारख सुवास म्हणत नाही... फारच अलन्कारिक वाटत` ..आदरमोद..). मन्दिरात गेले की तिथल्या धुपाच्या वासानी शुभन्करोती शिकवणर्या आई ची आठवण येते...

असो, तर असा माझा सुवासाचा प्रवास आज मी तुमच्या शी share करणार आहे.

बघा ना, कीती familiar असातो ना आपण या सगळ्या वसान्शी..?

आपल सगळ आयुष्य अस सुवासा (आता ईथे वास नाही म्हणता येणार...सोयीप्रमाणे घेते... :G :-G :खोखो:) भोवती घुटमळत असत......

एक मन्द तरल आठ्वण असते प्रत्येक सुवासा मागे, त्यात आपण जर एका विशीष्ठ वयात असू... म्हणजे, ना धड लहान ना धड मोठे, ना जबाबदार ना अवलम्बून, त्यात आपला प्रान्त सोडून बाहेर नोकरी करणारे, वगेरे अस काहीस असल` ना की या सुवासिक आठवणी फार त्रास देतात हो...

कईर्या आणल्या किव्वा दिसल्या की त्याचा मन भरुन वास घेतला ना की शाळेतले दीवस आठ्वतात, आपल मन सरळ त्या काळच्या वातावरणात जाउन पोहोचत ती शळेतली मज्जा, मित्र, मेत्रिणी, सम्पत आलेली परिक्षा, हवी हवी शी मे महीन्याची सुट्टी, सुट्टीतली, शेतातली, माळराणतली मज्जा, वटेश्वर, सन्ग्मेश्वर (पान्डव कालीन मन्दिरे) सारख्या ठिकाणी घालवलेल्या दुपारी, पाडलेल्या चिन्चा, कईर्या, नुसता कल्ला..., मोठ्ठ झाल्यावर प्रश्न पड्तो, ते १० वर्षातले ते मे महीने ईतके महत्वाचे होते??? आता मे आला काय गेला काय काssही फरक पडत नाही...

नव` पुस्तक हातात पडल्यावर त्याचा मन भरून वास घेतल्यावर शाळेची आठवण न येणारे फार कमी सापडतील.

पाऊसा च पण तसच... office च्या बन्द खिड्क्यातला पाऊस बघुन तर जास्त त्रास होतो... :( पण पावसाचा आवाज आणि मातीचा तो ओला वास आला ना की मला आठवत` सुर्गाणा...
माझे खापर आजोळ सुर्गाणा... आता हे खापर आजोळ काय प्रकार, तर आईच आजोळ... आहे हो अजुन शाबुत आहे.... त्यात काय सगळ्यानच च` असत... पण मला विशेष कशाच वाटत माहीतीये..? आई तीकडे गेली ना की अजुन तीचे लहान मुलासारखे लाड होतात. तिच्या आवडीनिवडी अजुन ही जपल्या जातात, बर विषय काय तर सुर्गाणा... काय सम्पन्न गाव हो,(निसर्गाने) बाकी सम्पन्नता अजुनही आलेली नाही, पाऊस अनुभवावा तर तिथलाच, छोट्या छोट्या पाडान्च गाव, भात शेतीच गाव, करवन्दाच्या जाळ्यान्चे डोन्गर, आळव`, जाम फळ खावी तर तिथलीच...शेणानी सारवलेली घर`, छानसा स्वयपाक करणारी मामीआजी, माणूसपण जपणारी माणस`... नेहमी नाही पण कधीतरी पावसाळ्यात आम्ही सुर्ग्गाण्याला असायाचो, सकाळ पासुन दुपार पर्यन्त उनाडक्या करायच्या, मग दुपार सरत आली की पाऊस भरुन यायचा, मग मन्मुराद पावसात भिजायच आणि घरी आल्यावर भजी, आल्याचा चहा, तान्दळाचे तळलेले पापड हे सगळ म्हणजे सुर्गाणा.... आणि गम्मत म्हणजे कासव छाप चा वास जरी अगदि मनापासुन घेतला ना तरी माझ्या या खापर आजोळाची आठवण आल्याखेरीज रहात नाही... खर काही गरज च नसायची रात्री झोपताना मछछर अगर्बत्ती ची, आम्ही खेळून दमायचो ईतके की डास काय माणसाने जरी चावा घेतला तरी जाग येणार नव्ह्ती... पण ही माणस` बीचारी शहरातुन आलेत डासान्चा त्रास नको म्हणुन काळजी घ्यायचे, मग रात्रीची ती मज्जा, गाद्या टाकल्या की बेड्शीट ची झोळी करून एक एकाने झोके घ्यायचे, त्यावरून भाण्डन, रूसा, फुगी, सगळी मज्जा नुसती.... आताशा कासव छाप ही एवढी लावली जात नाही.... तर असे हे सुवास वेड लावणारे असतात, स्वतहा बरोबर आठ्वणीन्च्या जगात घेउन जतात, बघा ना अजुनही कुठे बाहेर पडलो outing ला वगेरे, (शहरात राहून रोजच्या routine ला कण्टाळून आपण outing शक्य तो शहरापासून लाम्बच करतो) यायला सन्ध्याकाळ झाली की घरी परतताना छोटी छोटी गाव लागतात, एक सुखद गारवा असतो त्या वातावरणात, चुलीचा, भाकरीचा वास येतो, त्या क्श्णाला चुली जवळ बसून भाकरी खायची ईछ्चा होते, पण नाईलाजास्तव आपल्याला hotel गाठाव लागत....हे वास मला माझ्या गावाची आठवण करून देतात लहानपणाची आठवण करून देतात.
आत्ताच्या आपल्या जगण्यात ती जुनी मज्जा नाही...

असे हे सुवास मी मनात साठवते सतत, कधी कुठली आठवण येईल काय माहीती... :)
.
.
समाप्त.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आपल्या मेंदूत प्रत्येक वासाची एक प्रतिमा उमटलेली असते आणी हि प्रतिमा त्यावेळच्या स्मृतीशी घट्टपणे निगडीत असते. त्यामुळे आपल्या मित्र/ मैत्रिण जर एक विशिष्ट अत्तर / सुगंध वापरत असेल तर त्या सुगंधाचा वास आल्यास आपल्याला त्या मित्र/ मैत्रिणीची आठवण प्रकर्षाने येते.

मी माझ्या लग्नागोदर माझ्या (होणार्या) बायकोला GAMBIT हा सुगंध भेट दिला होता आणी तो सुगंध आमच्या लग्न ते हनिमून आणी एक वर्ष पर्यंत (सुगंध संपेपर्यंत) ती वापरत असे. त्यानंतर तो सुगंध मी कटाक्षाने परत आणणे टाळले. (अतिपरिचयात अवज्ञा होऊ नये म्हणून).

आता परत क्वचित कधी कुणाकडे हा सुगंधाचा दरवळ आला तर मला आपल्या सोनेरी आणी सुगंधी दिवसांचा पुनः प्रत्यय येतो.

(हा गंध या संवेदने बद्दल इतरत्र लिहिलेल्या एका लेखातील भाग आहे. )

आपल्या मेंदूत प्रत्येक वासाची एक प्रतिमा उमटलेली असते आणी हि प्रतिमा त्यावेळच्या स्मृतीशी घट्टपणे निगडीत असते. त्यामुळे आपल्या मित्र/ मैत्रिण जर एक विशिष्ट अत्तर / सुगंध वापरत असेल तर त्या सुगंधाचा वास आल्यास आपल्याला त्या मित्र/ मैत्रिणीची आठवण प्रकर्षाने येते. >>>>
मेंदुतला माणूस या पुस्तकात याचे सविस्तर माहिती दिली आहे.