प्रतिभावंत कलाकार..... प्रायोगिक नाटके!

Submitted by मी मधुरा on 23 November, 2019 - 13:14

प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात नाट्य स्पर्धा सुरु आहेत.
अत्यल्प दरात प्रायोगिक नाटके बघायला मिळतात आणि सोबतच अनेक उत्तम कलाकृती बघायला मिळण्याचीही संधी असते.

आज 'अखेरची पाककृती' नावाचे नाटक होते.
नाटकाचे लेखन तितकेसे आवडले नाही.
पण त्यातल्या तीन अभिनेत्रींचा अभिनय आणि नाटकाची एकूण संकल्पना ही जमेची बाजू होती.

सानिका आपटे नावाच्या एका अभिनेत्रीने जोरकस, मस्त, अगदी चोख अभिनय केला.

खरं सांगू?

प्रत्येक कलाकाराच्या प्रतिभेला योग्य न्याय, संधी आणि प्रोत्साहन मिळतेच असे नाही. कदाचित म्हणूनच इतके प्रतिभावंत कलाकारदेखील केवळ प्रायोगिक नाटकापुरतेच मर्यादित राहतात. याची जितकी खंत वाटते, तितकाच आनंद वाटतो अश्या कलाकारांना प्रत्यक्ष पाहिल्याचा. हे असे सहज-सुंदर अभिनय करणारे कलाकार भेटले, दिसले की अश्या हिऱ्यांना आपण प्रत्यक्ष पाहिलंय, याचा अनुभव हा चित्रपटांत अंग प्रदर्शन करून किंवा केवळ सौंदर्याच्या जीवावर स्टार्स बनलेल्या आणि लायकी पेक्षा जास्त प्रसिद्ध झालेल्या नट - नट्यांना दुरून पाहण्यापेक्षा खूप जास्त सुंदर असतो.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा धन्यवाद. सांगते बहिणीला. अहो ताई तुम्हाला प्रायोगिक चळव ळीच्या नाटकात रस असेल तर छ बिलदास चळवळ व त्यांची नाटके नक्की आवडतील. जरूर बघा बरेच युट्युब वर उप्लब्ध आहेत.

ok, Ama.
खरं सांगायचं तर प्रत्यक्ष जिवंत नाटक पाहण्यात जास्त रस आहे मला.
यूट्यूबच्या छोट्या स्क्रीन वर ती स्टेज वरची जादू अनुभवता येत नाही, असं वाटतं मला.

पण छबिलदास चळवळ ची नाटके प्रत्यक्ष पाहायला मिळाली तर नक्की पाहीन मी. Happy

राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा आज संपली आणि आता पुन्हा पुढच्या वर्षा पर्यंत वाट पाहावी लागणार म्हणून थोडे वाईटही वाटले.

काही नाटककारांनी जिवंत (live) संगीत देऊन नाटकाला सुंदर किनार दिली. काही नाटकांनी अंतर्मुख व्हायला लावले, टाळ्या वाजवायला लावल्या, हसायला लावलं...... तर काहींनी निव्वळ गोंधळ घातला रंगमंचावर.
एक जीवंत कलाकृती कुठलेही पुर्वग्रह नसताना अनुभवण्याचा आनंद मात्र प्रत्येक नाटकाने दिला. कारण चेहरेही नवीन होते आणि अनेक नाटकांचे विषयही!

पोंगा पंडित नाटक खूप आवडलं मला. एका चतुर नावाच्या धांदरट राजाची काल्पनिक कथा हास्यरंग उधळत अगदी मस्त रंगवली होती.

'बालीवध'ही छान होते. 'सायकायट्रिस्ट' नाटकही ही धक्का देत प्रेक्षकांना खिळवून ठेवत होते.

एकूणच काय, अश्या स्पर्धा होत राहाव्यात आणि उत्तम कलाकृती बघायला मिळत राहाव्यात. Happy