महाराष्ट्राचे नवनिर्वाचीत मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन

Submitted by नोझिपा मरारे on 22 November, 2019 - 22:37

महाराष्ट्राचे नवनिर्वाचीत मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन !
तसेच महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचेही अभिनंदन !
मायबोलीवरील भारतॉय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस या अनुक्रमे हिंदुत्ववादी व सेक्युलर पक्षाच्ञा समर्थकांचे देखील मनःपूर्वक अभिनंदन.

भरव्या / हिगव्या रंगाचे सरकार राज्याला मिळाल्याबद्दल महाराष्ट्राचेही अभिनंदन !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनापासून अभिनंदन!!

फडणवीसांना ट्रोल करणारे आता कुठे लपतील? Lol

मी पुन्हा येईन......
-देवेंद्र

तथास्तू!
-अजित पवार

अभिनंदन महाराष्ट्र! Happy
पुन्हा नरेंद्र, पुन्हा देवेंद्र! Happy

भ्रष्टांची मदत घेणे हा पराकोटीचा बेशरमपणा आहे. फडणवीस इतकी खालची पातळी गाठतील असं वाटलं नव्हतं.

रात्री देखील तितक्याच तत्परतेने काम केल्याबद्दल राज्यपालांचे आणि राष्ट्रपतींचे देखील अभिनंदन

भ्रष्टांची मदत घेणे हा पराकोटीचा बेशरमपणा आहे. फडणवीस इतकी खालची पातळी गाठतील असं वाटलं नव्हतं.

Submitted by पुरोगामी on 23 November, 2019 - 09:53. >>>

हे काम एकट्या फडणविसांचे आहे यावर एखादे लहान मुलच विश्वास ठेवू शकते.

जाऊ दे पुरोगामी . आपण सगळे मिळून नेहरुंना नावं ठेऊ. सोप्पं आहे ते. आणि मग भक्त ही अंगावर येत नाहीत. ... फडणवीस मुख्यमंत्री झाल्या बद्दल भक्तांच मनापासून
अभिनंदन.

अभिनंदन. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हायला हवे होते मलाही पण सिंचन घोटाळ्यांचे आरोप ज्यांच्यावर केले त्यांच्यासोबत नाही.

मोदी पवार भेट झाली तेव्हा काहीतरी ठरलं असणार, हे सर्व इतकं साधसुधे नाही. वाईट शिवसेनेचे वाटतं, पाच वर्ष सरकारमध्ये राहून त्यांनी शक्यता अशी होऊ शकते हा विचार केला नाही का. चांगलं उपमुख्यमंत्रीपद मिळत होतं, मंत्री पदे अजून मिळाली असती. आता हाती धुपाटणे आलं. त्यांनी पहिल्या दिवसापासून कुऱ्हाडीवर पाय ठेवला हे सगळ्यांना दिसत होतं. ते मात्र हवेत होते.

काही वाईट वाटायचे कारण नाही. ते सगळे आतून एकच आहेत. देव-धर्म-प्रांत इ. वरून लोकांच्या भावना चीथवून राजकारण करणे हा यांचा समान धागा. फरक इतकाच कि त्यांनी धर्माच्या नावावर आणि ह्यांनी शिवरायांच्या नावावर दुकाने चालवली आहेत इतकेच. बहुजन जनतेची दोघानाही काहीही पडलेली नाही. इतक्या वर्षात सहकार चळवळ, संस्था, उद्योगधंद्यांची उभारणी यातले एकतरी किंवा अन्य कोणते लोकोपयोगी कार्य यांनी केले आहे का ते दाखवा. पब्लिकला उल्लू बनवणे हेच यांचे कर्तृत्व. हजारो वर्षे.

काकांच्या मंद चालीवर पुतण्याचा विश्वास नव्हता हे काकांना माहीतही असेल पण निरुपाय होता.

महाराष्ट्रासाठी फडणवीस च मुख्यमंत्री म्हणून योग्य आहेत.

अनेक अभिनंदन! पुढील पाच वर्षे आता स्थिर व विकासपुरक सरकार राहणार हे बरे झाले. नाहीतर ते महा आघाडी वाले सगळेच प्रकल्प केराच्या टोपलीत टाकायला निघाले होते.

>>पण हे सरकार खरेच होणार आहे का?<<
ते तुम्ही कुठल्या काठावर उभे आहात त्यावर अवलंबुन आहे. एकाने पेढ्यांची ऑर्डर दिली तर दुसर्‍याने फटाक्यांची माळ लावली. आता सुप्रिम कोर्ट कोणाच्या बुडाखाली सुतळी बाँब लावते ते पाहुया... Proud

>>> ते तुम्ही कुठल्या काठावर उभे आहात त्यावर अवलंबुन आहे. एकाने पेढ्यांची ऑर्डर दिली तर दुसर्‍याने फटाक्यांची माळ लावली. आता सुप्रिम कोर्ट कोणाच्या बुडाखाली सुतळी बाँब लावते ते पाहुया... >>>

Rofl

सोपं आहे, सुप्रीम कोर्ट म्हणेल की सरकार स्थापनेचा शि- रा - कों यांनी कुठलाही प्रस्ताव दिला नाही. तो भाजपने व रा काँ मधील फुटीर गटाने दिला. त्यामुळे राज्यपालांचा निर्णय रद्द करण्याचा प्रश्न येत नाही.

फार तर बहुमत सोमवारी किंवा मंगळवारी सिद्ध करा म्हणून सांगतील. बाकीचं व्हीप वगैरे काढायचं काम अजित पवार करतीलच त्यामुळे बहुमताचा आकडा ११८ वर येईल.

मला राज यांच्या पोस्ट वाचून अजूनही होप्स वाटतायत की ५ वर्ष बाजीराव मस्तानीला सहन करावं लागणार नाही.
जर आमदार परत आलेत तर नंबर्स भाजपकडे नाहीच आहेत.
आनि ७९ व्या वर्षी पवार इतका दगाफटका करतील का!

>>> बाकीचं व्हीप वगैरे काढायचं काम अजित पवार करतीलच त्यामुळे बहुमताचा आकडा ११८ वर येईल. >>>

कायदेपंडीत उल्हास बापट यांच्या मतानुसार आता जयंत पाटील हेच गटनेता आहेत व व्हिप काढण्याचा त्यांनाच कायदेशीर अधिकार आहे. त्यांनी या दोन टाळक्यांच्या सरकारविरूद्ध मत देण्याचा व्हिप काढला तर दस्तुरखुद्द अजितदादांना स्वत: विरूद्ध मत देणे बंधनकारक असेल.

नवीन Submitted by पुरोगामी on 24 November, 2019 - 10:14 >>>

हे कायदेपंडित विधानसभा अध्यक्ष किंवा राज्यपाल आहेत काय?

गट नेता ठरवण्यासाठी विधीमंडळ पक्षाची बैठक बोलवावी लागते. ती विधीमंडळ नेताच बोलावू शकतो. जयंत पाटील यांना विधीमंडळ नेता बनवताना अजित पवार यांची सही नव्हती. जे ५४ आमदार निवडून आले आहेत त्यांनी भाजपला पाठिंबा दिल्याचे पत्र अजितदादांनी राज्यपालांना दिले आहे. त्या ५४ आमदारांच्या सह्या आहेत त्यावर. त्यामुळे अजितदादा फुटलेत असे म्हणता येत नाही. उलट भाजपाशी युती केलेल्या विधीमंडळ पक्षातून फुटून बाहेर गेलेल्यांना आता पक्षांतरबंदी कायदा लागू होईल. ३६ आमदार बाहेर पडले तर तो नवा व स्वतंत्र गट मानला जाईल. अन्यथा ते अपात्र ठरतील.

राष्ट्रवादीतील २/३ आमदारांनी फुटून नवीन पक्ष स्थापन करून,उरलेल्या आमदारांनीही नवीन पक्ष स्थापन केल्यास त्यांना अजित पवारांच्या वीप पासून दूर ठेवता येईल का?

अगदी बरोबर @पुरोगामी गाढव, आता गटनेता निवडण्यासाठी आधी अजित पवारांची व समर्थक आमदारांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी करावी लागेल. त्या परिस्थितीत त्यांच्यावर पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही.

वृत्तपत्रांत जरी ४ते ५ आमदार फुटले असे शिवसेना व राको म्हणत असतील, तरीही कुणाचीही हकालपट्टी न झाल्याने खरी संख्या बरीच जास्त आहे हेच दिसतंय. कालच्या बैठकीत विधान परिषदेच्या आमदारांना आणलेलं अशी बातमी लोकमत ने दिली.

Pages