"मिटलेलं पान"

Submitted by mi manasi on 20 November, 2019 - 09:10

"मिटलेलं पान"

तुटलेल्या नात्यांचे
जरतारी पदर
त्या ना मायेची उब
प्रेमाची कदर
गाठीगाठीत फक्त
बोचरे आठव
कशास मिरवायचे?
भरजरी पाटव !……… १

तो पाठीवर हात अन
डोळ्यात पाणी
ते तुडुंबलेलं मन
श्वासात गाणी
क्षणाक्षणाने दिलं
जीवनाचं दान
उघडेल का कुणी कोणी ते?
मिटलेलं पान……………….. २
.....मी मानसी

Group content visibility: 
Public - accessible to all site users