चाॅकलेटं

Submitted by कांचनगंगा on 20 November, 2019 - 02:32

चाॅकलेटं

चाॅकलेटं, नानाविध प्रकारांची नानाविध आकारांची
चमकदार रंगीत कागदांतली, लोभविणाऱ्या स्वादांतली

काही कडू, काही गोड, काही फक्त मिट्ट गोड
काहींचा श्यामल वर्ण, काहींचा गौर रंग
चवीपरींचे त्यांचे किती सुरस अंतरंग

काही साधीशीच, गोल अथवा चौकोनी
एखादं सुंदरसं हृदयाकृती रूमानी

काही दिसतात कडू, अंतरी बदाम अन् बेदाणे
काहींचे फक्त वरवरचे मधुर चवींचे बहाणे

काही खूप प्रिय असतात, मनापासून आवडतात
कितीही लाभली तरी थोडी कमीच वाटतात

पुरवून पुरवून खाल्ली तरी, संपतातच कधीतरी
प्रत्येक नात्याला शेवट हा असतोच कुठेतरी

चाॅकलेटची चव मग रेंगाळत राहते जिभेवर
आठवणीही राहतात सोबत, साय धरत मनावर.

कांचन

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults