अगदी छोटी गोष्ट....

Submitted by मुकूल on 16 November, 2019 - 03:45

रोहित: शिऱ्या,अरे AMBULANCE आहे आपल्या मागे..तू जरा साईडला घे गाडी..रस्ता मोकळा करून द्यायला हवा..

शिरीष: अरे हे उगाचच सायरन वाजवत जातात आत PATIENT नसला तरी..५ मिनिटाने काय होणारे यार आणि असा पण इतका ट्रॅफिक जॅम झालाय..फक्त आपणंच गाडी बाजूला घेऊन काय होणारे?पुढे जाऊन अडकणारच ना..

रोहितला DROP करून शिरीष घरी पोहचला.थोड्या वेळात फोन वाजला नि बाबांच्या ACCIDENT ची बातमी कळली.हॉस्पिटल मध्ये पोहोचेपर्यंत सगळं संपलेले होतं..

डॉक्टर:बराच रक्तस्त्राव होऊन गेलेला ..ambulance थोडी आधी पोहचली असती तर कदाचित वाचवू शकलो असतो...

शिरीषला त्याच्या आसवांच्या पुरात सायरन वाजवत वाट काढत जाणारी AMBULANCE पुसटशी दिसू लागली ..नकळतपणे..!!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults