आज काय चांगलं झालं..

Submitted by वेडोबा on 15 November, 2019 - 08:52

वाचकहो, आपण आपल्या बरोबर घडलेल्या चांगल्या गोष्टी इथे शेअर करू आणि आपला आनंद वाढवू..रोज काही ना काही चांगलं घडत असतं , आपण ते शोधु आणि इथे लिहूया... चला करू सुरवात..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज हा छान धागा वाचायला मिळाला Happy

मी पहिल्याच प्रयत्न केलेल्या मोत्याची फुलं बऱ्याच जणांना आवडली आणि मला आज पहिली ऑर्डर पण मिळाली , ही अजून 1 चांगली गोष्ट घडली Happy

मी पहिल्याच प्रयत्न केलेल्या मोत्याची फुलं बऱ्याच जणांना आवडली. >> इथे फोटो दाखवा फुलांचा , ऑर्डरी वाढायची शक्यता आहे. ☺

नक्की मनिमोहोर, पण त्यासाठी स्वतंत्र पोस्ट टाकावी किंवा धागा उघडावा लागेल ना, की इथेच टाकलं तर चालेल ? सॉरी, पण याआधी कधी अशी कामाची किंवा प्रमोशनल पोस्ट टाकली नाही , म्हणून विचारले...

1.काल Men' s Day च्या निमित्ताने ऑफिसमध्ये सगळ्या पुरूषांना ग्रिंटींग आणि चाॅकलेटस देण्यात आली..सोबत खास पुरूषांसाठी रॅम्प वाॅकदेखील ठेवलं होतं..रॅम्प वाॅक करताना खुप मजा आली..

2.रोज सकाळी भाजी पोळी झाल्यावर किचनच्या खिडकीत सौ. पोळी/ भाकरीचा तुकडा ठेवते...नेहमीचा कावळा येऊन खाऊन जातो..आज पोळी दिल्यावरही जास्तच काव काव आणि स्लायडींगच्या काचेवर टकटक करत होता म्हणून मी भूक लागली असेल तर आणखी तुकडा देण्यासाठी खिडकीची काच सरकवरली तर त्याच्या चोचीत कपड्यांचा चिमटा होता आणि तो ते द्यायला आलेला... चिमटा आमचा नव्हता पण कावळ्यांने आणलेली भेट खुप आवडली...

मेन्स डे निमित्त सर्व पुरुषांना कप केक आणि मिश्या(म्हणजे कप केक वर मिश्या स्टिकर लावून) दिले होते.आम्ही सर्वांना विश केले.लोक(लोकी) फ्लोअर वर सोनेरी फुगे घेऊन विश करत फिरले.बऱ्याच जणांना आपला असा काही दिवस असतो हे ऐकून धक्का बसला पण छानही वाटले.आम्हाला वेळ मिळाला नाही पण इतर टीम मधील स्त्रियांनी विचारपूर्वक माउस पॅड वरून ज्याचे त्याचे फोटो छापून वगैरे पुरुषांना गिफ्ट दिले होते.असे डेज असण्यातला सुपर फिशियल पणा सोडल्यास मला त्या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून भारी वाटले.

दिगंतराचे प्रवासी हा पक्ष्यांचा सुंदर धागा वाचून डोळे तृप्त झाले आणि दुसरा एक विनोदी धागा वाचून खूप हसले....

आज प्रदा आणि कला म्हणजे प्रशांत दामले आणि कविता लाड यांची मुलाखत कलर मराठीवर पाहिली हरहुन्नरी कलाकार आहे प्रदा

+1
हेच टाईप करायला आले होते.
2.मस्त राजस्थानी चाट चे दुकान सापडले, खूप खादाडी केली.

मी आज सोयाबीन चिली आणि फ़्रेंच फ्राईस बनवले, सोया चिली पाहिल्यादा बनवली आणि खूप आवडली घरात सगळयाना ,मला खूप आनंद झालाय

काल दुश्यम चित्रपटात काम केलेले.. हुरहुन्नरी अभिनेते कमलेश सावंत भेटले.. खुपच डाऊन टू अर्थ माणूस..आमच्याशी सहज गप्पा मारल्या..
छान वाटलं त्याना भेटून...

PicsArt_11-23-12.18.21.jpg

हा एक खुप छान initiative आहे. आज मी स्टेशन वर असताना एक कुली खुप सामान घेउन जिन्यावरुन उतरला आणि डोक्यावर दोन bags असताना त्याच्या हातातली bag खाली पडली...मी लगेच ती त्याला परत देण्यासाठी धावले...आणि माझं हे क्रुत्य़ बघुन आजुबाजुचे लोक देखील त्याच्या मदतीला आले

Pages