"पानिपत"चे ट्रेलर आणि ऐतिहासिक भूमिका

Submitted by निमिष_सोनार on 7 November, 2019 - 11:49

सदाशिवराव पेशवेंच्या रोलसाठी आशुतोष गोवारीकरने अर्जुन कपूरला निवडून चूक केली हे "पानिपत" चे ट्रेलर पाहील्यावर बरेच जण म्हणत आहेत. अशीच काहीशी फिलिंग आशुतोषने "जोधा अकबर" मध्ये हृतिकला घेतले होते तेव्हा माझी होत होती. कहो ना प्यार हैं, धूम 2, क्रिश, कोई मिल गया यासारखे रोल करणारा हृतिक ऐतिहासिक राजाच्या भूमिकेत फिट बसेल याला माझे मन मानायला तयारच होत नव्हते, पण जोधा अकबर पाहिल्यानंतर हृतिक मला त्या भूमिकेत अतिशय योग्य वाटला. पण "मोहेंजो दडो" मात्र फ्लॉप झाला, त्यातही हृतिक ऐतिहासिक भूमिकेत होता.

पद्मावतमध्ये संजय लीला भन्साळीने शाहिद कपूरला महाराजा रतन सिंगची भूमिका दिली तेव्हा असेच काहीसे वाटले होते, पण मॅनेज होऊन गेले पण रणवीर व्हिलन च्या रोल मध्ये भाव खाऊन गेला आणि राष्ट्रीय पुरस्कार पण घेऊन गेला.

क क क किरण, परदेस तसेच दिलवाले, बाजीगर, अंजाम, चाहत वाला शाहरुख खान सम्राट अशोक म्हणून कसातरीच वाटेल असे वाटायचे पण नंतर संतोष सिवनच्या कल्पक कॅमेरा वर्क आणि सिनेमॅटोग्राफीमुळे तोही त्यात फिट बसून गेला. उलट त्याचा चित्रपटातील प्रतिस्पर्धी भाऊ सुशिम (अजिथ कुमार) यांच्यासोबतचे डायलॉग शाहरुखने अतिशय रंजकपणाने म्हटले आणि अर्थातच करीना कपूरचा (कौर्वकी) स्लिम ट्रीम फिगर मधला बोल्ड अंदाज आणि चांगली गाणी यामुळेसुद्धा चित्रपट तरुन गेला!

तसेच राणी लक्ष्मीबाईच्या भूमिकेत कंगना राणावत शोभली की नाही याबाबाबत विविध मते आहेत पण ओव्हरऑल चित्रपट चांगला होता आणि हो कंगना त्याची डायरेक्टर पण होती. अतुल कुलकर्णीचा तात्या टोपे माझ्या लक्षात राहिला.

अजून एका गोष्टीचे मी निरीक्षण केले आहे की कुलभूषण खरबंदा या अभिनेत्याशिवाय कोणताही ऐतिहासिक चित्रपट पूर्ण होऊच शकत नाही. जवळपास प्रत्येक ऐतिहासिक चित्रपटात तो असतोच असतो!

तसेच अर्जुन कपूरपण पानिपत चित्रपट पाहिल्यावर योग्य वाटू शकतो, नुसतं ट्रेलर बघून टोकाची मते नाही बनवू शकत! शेवटी 6 डिसेंबर आल्यावर कळेलच! तोपर्यंत वाट बघावी लागेल. बाकी इतर अनेक कलाकार चांगले आहेतच की! आणि हो लगान आणि जोधा अकबर सारखा पानिपत सुद्धा साडे तीन तासाचा आहे म्हणे. हरकत नाही कारण, प्रत्येक पात्र, घटना यांना न्याय द्यायचा तर चित्रपट मोठा तर होणारच!!

ऐतिहासिक चित्रपट बनवणं खूप खर्चिक काम आहे, खूप संशोधन करावं लागतं अनेक पात्रे असतात, भरपूर कलाकार घ्यावे लागतात, त्यांच्या तारखा मिळणे आवश्यक असते. नुसते त्या ऐतिहासिक व्यक्तिरेखेसारखा दिसणारा अभिनेता घेऊन चालत नाही तर त्याला अभिनय आणि घोडेस्वारी, एँक्शन, तलवारबाजी, त्या काळातील भाषेचे स्पष्ट उच्चार हे यायला हवे हे सुद्धा बघावे लागते.

पण नेटकऱ्यांनी तर लगेच टर उडवायला सुरुवात केलीसुद्धा, अर्थात त्यांना कोण रोखणार?

काहीजण म्हणतात की थोडा पद्मावत घ्या, थोडा बाजीराव मस्तानी घ्या, थोडा जोधा अकबर टाका की झाला पानिपत तयार! एक तर या बऱ्याच टीकाकार लोकांना इतिहास माहिती आहे की नाही याची शंका यते आणि बाजीराव मस्तानीच्या काळाच्या पुढे घडणारी ही कथा असल्याने इतर चित्रपटाशी असणारा सारखेपणा येणारच ना!

पद्मावत मधला रणवीरने साकारलेला अलाउद्दीन खिलजी अभिनयात शाहिदला भारी पडला असे काहीजण म्हणतात तसेच पानिपत मध्ये संजय दत्त अहमद शाह अब्दालीच्या भूमिकेत भारी पडेल असे बरेच जण म्हणतात, पण आधीच विविध निगेटिव्ह तर्क लढवण्यापेक्षा पानिपत युद्धासारख्या सारख्या क्लिष्ट आणि अनेक कंगोरे असलेल्या ऐतिहासिक कथेवर कुणीतरी चित्रपट बनवण्याची हिम्मत करतोय याची दाद द्यायला हवी.

सध्या कलर्स मराठी वर सुरू असलेली स्वामिनी सिरीयल पण "पानिपत" च्या काळाच्या आसपासचीच आहे, तेव्हा चित्रपट रिलीज झाल्यावर त्या मालिकेच्या प्रेक्षकवर्गावर बरा वाईट परिणाम तर नाही ना होणार याची भीती आहे कारण मालिकासुद्धा उत्तम आणि दर्जेदार आहे पण अर्थात मालिकेचे बजेट कमी असल्याने त्यात युद्धाचे प्रसंग दाखवणार नाहीत असे वाटते आणि ती मालिका माधवराव आणि रमाबाई यांच्या शनिवार वाड्यावरच्या घरगुती गोष्टींवर केंद्रित असेल हे नक्की!!

बाजीराव मस्तानी चित्रपट येऊन गेल्यानंतर मग सोनी टीव्ही ने "पेशवा बाजीराव" मालिका सुरु केली होती आणि ती चांगली चालली होती. त्यात पहिले पेशवे बाजीराव यांचे वडील बाळाजी विश्वनाथ भट (मनीष वाधवा खूप शोभून दिसला त्या भूमिकेत आणि अभिनय पण उत्तम केला होता त्याने) यांची पण कथा सांगितली होती तसेच बाजीरावच्या लहानपणापासूनचे प्रसंग होते! (त्यात अनुजा साठेने बाजीरावच्या आईची भूमिका केली होती पण ती थोडी अतिरंजित आणि लाऊड वाटली) त्यामुळे सिरीयल आणि चित्रपट यांचा एकमेकांवर तसा परिणाम होईल असे वाटत नाही.

मागे तर शहीद भगत सिंगवर अजय देवगण आणि बॉबी देओल यांचे वेगवेगळे चित्रपट एकाच वेळेस रिलीज झाले होते हे वाचकांना आठवत असेलच.

तसेच जानेवारीत २०२० मध्ये अजय देवगण तानाजी मालुसरेवर आधारित "तानाजी" हा चित्रपट घेऊन येतोय, त्याचा ट्रेलर मात्र अजून रिलीज झालेला नाही. अजय देवगण भगत सिंग म्हणून शोभून दिसला (बॉबी पेक्षा) आणि तानाजी म्हणून पण शोभेल, अशी आशा आहे.

- निमिष सोनार, पुणे
(एक चित्रपट प्रेमी)

#लेखनैमिष
#nimishtics

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वामिनी मालिका उत्तम व दर्जेदार आहे हे ऐकून काय बोलावं कळत नाहीये.

पण वरती पानिपतबद्दल लिहिलंय त्याच्याशी सहमत. भार्री वाटतोय तो मुव्ही.

टिपीकल बॉलीवूडपट असणार आहे. इतिहास अन तो देखील आपला चुकीच्या पद्धतीने दाखवायच्या बॉलीवूडी पद्धतीचा निषेध कायमच असणार आहे. फुकट मिळाला तरी बघणार नाही.

ट्रेलरदेखील अर्थातच पाहिले नाही.