श्रीकृष्ण दर्शन

Submitted by सर्वेश के on 7 November, 2019 - 08:41

संघभावना अन् समन्वयाचे
नयनरम्य दृश्य घे आकार
गाती टिपऱ्या एकसुराने
करिती रासक्रीडा साकार

तृप्तता श्रवणी आणि नयनी
पाहता हा अपुर्व सोहळा
शब्दसुरांच्याही पलीकडला
कृष्णगोपिकांचा मेळा

योगेश्वर सांगे भगवद् "गीता"
नात्यांमधली क्लिष्ट सरलता
तोचि कृष्ण या येऊन अवचित
झाला आम्हा दर्शन देता

Group content visibility: 
Use group defaults

छान.
पहील्यांदा संघ शब्द ऐकून हबकलेच होते म्हटलं राजकारणावर कविता आहे की काय.