रंगभूमी

Submitted by vijaya kelkar on 6 November, 2019 - 01:41

रंगभूमी
बाल्य,तारुण्य,वार्धक्य
नाटक "जीवन" तीन अंकी
हास्य,सौख्य, दास्य,इ.चे ऐक्य
चालते फिरत्या मंचकी

नेपथ्य सांभाळती शशी-मित्र
विविध रसरंग उधळती सर्वत्र
'देव' दिग्दर्शक महाविख्यात
नानाविध नावांनी अलंकृत

शोकांतिका की सुखांतिका
ठरवतील प्रेक्षक मायबाप
नमस्कार या उत्तम परिक्षका
याच रंगभूमीवर सरोत पाप

रंगभूमीवर रंगेल अंतिम प्रयोग
तारीख नंतर घोषित होणार...
लवकर येणार स्वर्णिम योग
तिकिटबुकिंग लगेच सुरु होणार

येतील नवीन कलाकार
प्रयोग होतच रहाणार
जाणार्‍यास अखेरचा प्रणाम
नवोदित रंगभूमी गाजवणार..
प्रणाम

विजया केळकर______

Group content visibility: 
Use group defaults

सुंदर....