दीपावली

Submitted by सर्वेश के on 3 November, 2019 - 07:20

दीपावली
दूर होऊनि तिमिर येथला
तेजोमय करी सर्व जगाला
संदेश घेऊनि येई दिवाळी
बनुदे पणती प्रकाशमाला

अवघे जीवन हो आनंदमय
प्रेमज्योत ठेऊनी अखंड तेवत
दीपावलीच्या पर्वात जागु दे
मानवता मनामनात सदोदित

हे विधात्या शक्ती दे मज
देण्या हात एक मदतीचा
दाही दिशा ना उजळी जरी
प्रकाश करण्या एक पणतीचा

Group content visibility: 
Use group defaults