जात

Submitted by शुएदि on 1 November, 2019 - 15:52

देवाने बनवलं माणसाला
दिली एक जात
"सांभाळ रे बाबा
ही 'माणुसकीची' जात"...

पृथ्वीवर येऊन माणसाने
भाग किती केले
स्पृश्य आणि अस्पृश्यांचे
समाज उभे राहिले...

वेगवेगळ्या जाती त्याने
उभ्या केल्या किती
"माणुसकीची" जात विसरला
विसरला माणुसकीची नाती...

महापुरुषांनी समजावले तरी
त्याला समजलं नाही
जातींचं भूत काही
मानेवरून हटलं नाही...

तुझी माझी जात
यात वेळ चालला
माणुसकीची जात विसरून
खुप काळ लोटला..

वाटत असेल देवालाही
"असे कसे झाले?"
"माझ्या लेकरांमध्येच कसे
जातीचे भाग पडले?"

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users