२०५० साली सं.पुर्ण मुं.बई पाण्याखाली बुडणार !

Submitted by ऋन्मेऽऽष on 1 November, 2019 - 12:16

न्यूयॉर्कच्या जगप्रसिद्ध क्लायमेट सेंट्रल संस्थेच्या संशोधन अहवालानुसार येत्या तीस वर्षात म्हणजेच २०५० सालापर्यंत समुद्राची पातळी वाढून मुंबई शहर संपुर्णपणे पाण्याखाली जाणार आहे.

गेल्या महिन्यात मला आरे वाचवा असा धागा काढावा लागला होता. कदाचित पुढच्या पिढीतील माझ्या पोरांना मुंबई वाचवा धागा काढावा लागेल.

मी आरेचा धागा काढला तेव्हा याआधीच्या वृक्षतोडीला तू कुठे झोपला होतास असा उलटा सवाल मलाच विचारला गेला होता.
त्यामुळे यंदा काळजी घेत तीस वर्षे आधीच हा धागा काढत आहे.

शक्य झाल्यास आता तरी राजकीय हेवेदावे विसरून मुंबईला, महाराष्ट्राच्या अस्मितेला, या देशाच्या आर्थिक राजधानीला वाचवायला पुढाकार घ्या.

एक सुजाण नागरीक म्हणून आपल्याला आजपासूनच यावर काय करता येईल. आणि अ-राजकीय ईच्छाशक्तींपुढे जर पुन्हा एकदा आपण लाचार ठरलो तर या संकटापासून स्वत:ला आणि आपल्या पुढील पिढीला सुरक्षित ठेवायला काय करता येईल. याची चर्चा करायला हा धागा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुंबई बुडणार हा निष्कर्ष आज काढलेला नाही. नॅशनल जिओग्राफीत मी चार पाच वर्षांपूर्वी हे वाचले होते. ग्लोबल वॉर्मिंगमुळे सगळे बर्फ वितळले तर वाढलेले पाणी किती जमिनीचा घास घेईल व त्यामुळे किती शहरे पाण्याखाली जातील याचा एक अंदाज लेखात वर्तवला होता. आणि फक्त मुंबैच बुडत नाहीये, जगभरातील सर्व समुद्रकिनारास्थित गावे/शहरे बुडणार आहेत… माझ्यामते २०५० ही तारीख जरा जास्तच अलीकडची घेतलीय. पण माझ्या मताला शास्त्रीय आधार नाही आणि निसर्गाचा ऱ्हास करायचा मानवी वेग माझ्या कल्पनेच्या बाहेर आहे. त्यामुळे निदान २०५० च्या आधी मुंबई बुडू नये ही सदिच्छा व्यक्त करण्याखेरीज दुसरे काही करणे हाती नाही !!!

https://www.nationalgeographic.com/magazine/2013/09/rising-seas-ice-melt...

आणि आता स्वत: लोन काढून नवी मुंबईत चौथे घेतोय>>>

अरे देवा... Sad Sad

अरे देवा... Sad
हो
घर विकत घेण्याआधी मी नवी मुंबईत भाड्याने काही काळ राहिलो. परिसराला समजून घेतले. कुठे काय शाळा कॉलेज बाजारपेठ फेसिलिटी आहेत. कुठे काय मच्छर नाले कुत्रे रिक्षा न मिळणे वगैरे त्रास आहेत. कुठले भाग रात्रीचे निर्जन वा असुरक्षित आहेत, कुठे पावसाळ्यात पाणी तुंबते तर कुठे निचरा होतो. कुठला भाग हिंदू मुस्लिम सेन्सेटीव्ह आहे, कुठे मराठा मोर्चाने उग्र रूप धारण केलेले.... एकंदरीत आपण बरेच गोष्टी बघून आपले घर फायनल केले असे वाटत होते. पण अखेर बोंब झालीच. पण आधी माहीत असते तरी ३० वर्षांनी बुडेल या भितीने मी मुंबई वा परीसर सोडला नसता हे ही खरेय.

जगातील संपुर्ण मानव जातीचा शेवट होणे गरजेचं आहे कारण मानव खुप असमाधानी होऊन माजलाय आता. जेवढ्या लवकर होईल तेवढं बरं होईल.

{जगातील संपुर्ण मानव जातीचा शेवट होणे गरजेचं आहे कारण मानव खुप असमाधानी होऊन माजलाय आता. जेवढ्या लवकर होईल तेवढं बरं होईल.}
भावा, नैराश्याचा झटका आलाय का?

मुंबई बुडाली तर पुण्याला समुद्र किनारा लाभेल काय?
>>>>

लाभू नये अशीच प्रार्थना करा
नाहीतर पुढचा नंबर पुण्याचा

जगातील संपुर्ण मानव जातीचा शेवट होणे गरजेचं आहे कारण मानव खुप असमाधानी होऊन माजलाय आता.
>>>

आपल्याला बोलायला काय जाते. आपले आयुष्य झालेय जगून.
भोगणार आणि मरणार येणारी पिढी

बुडणे काय असते हे मुंबई नी काही वर्षा पूर्वी अनुभवलं आहे .काही ठिकाणी तिसरा माळा सुद्धा पाण्याखाली गेला होता ,.रस्ते जलमय झाले होते doble decker बस च्या छता वर बसून लोकांनी रात्र काढली होती.
ना अन्न ना पाणी.
सर्व आधुनिक यंत्रणा लोकांना वाचवू शकल्या नाहीत.
दरवाजा न उघडल्या मुळे किती तरी लोकांना गाडी मध्येच इहलोकाची यात्रा संपवावी लागली होती.
ह्या वर्षी कोल्हापूर,पुणे,आणि इतर शहरांनी अनुभव घेतला आहे.
पुणे बंगलोर hamrastyala पाण्यानी चारी बाजूने वेढा दिला हिता पावसाचा जोर कमी नसता झाला किती तरी मोठा भाग लोकांसाठी मृत्यूचे प्रवेश द्वार झाला असता..
हवामान बदलला किरकोळ समजण्याची आणि हसण्यावर नेण्याची चूक करू नये.
जाणकार अभ्यासू लोक इशारा देत आहेत त्यात तथ्य आहे.

Pages