२०५० साली सं.पुर्ण मुं.बई पाण्याखाली बुडणार !

Submitted by ऋन्मेऽऽष on 1 November, 2019 - 12:16

न्यूयॉर्कच्या जगप्रसिद्ध क्लायमेट सेंट्रल संस्थेच्या संशोधन अहवालानुसार येत्या तीस वर्षात म्हणजेच २०५० सालापर्यंत समुद्राची पातळी वाढून मुंबई शहर संपुर्णपणे पाण्याखाली जाणार आहे.

गेल्या महिन्यात मला आरे वाचवा असा धागा काढावा लागला होता. कदाचित पुढच्या पिढीतील माझ्या पोरांना मुंबई वाचवा धागा काढावा लागेल.

मी आरेचा धागा काढला तेव्हा याआधीच्या वृक्षतोडीला तू कुठे झोपला होतास असा उलटा सवाल मलाच विचारला गेला होता.
त्यामुळे यंदा काळजी घेत तीस वर्षे आधीच हा धागा काढत आहे.

शक्य झाल्यास आता तरी राजकीय हेवेदावे विसरून मुंबईला, महाराष्ट्राच्या अस्मितेला, या देशाच्या आर्थिक राजधानीला वाचवायला पुढाकार घ्या.

एक सुजाण नागरीक म्हणून आपल्याला आजपासूनच यावर काय करता येईल. आणि अ-राजकीय ईच्छाशक्तींपुढे जर पुन्हा एकदा आपण लाचार ठरलो तर या संकटापासून स्वत:ला आणि आपल्या पुढील पिढीला सुरक्षित ठेवायला काय करता येईल. याची चर्चा करायला हा धागा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुंबई ही नुसती जागा नाही ती प्रत्येक मुंबईकरामुळे बनलेली एक प्रतीसृष्टी आहे.
आजपासूनच प्रत्येक मुंबईकराने एकेका यूपी, बिहारी, बांग्लादेशीला दत्तक घेऊन आपल्या घरात आश्रय द्या... म्हणजे जेव्हा मुंबई बुडेल तेव्हा तुम्ही त्यांच्याबरोबर यूपी, बिहार, बांग्लादेशला त्यांच्या घरी जाऊन राहू शकाल आणि तेव्हा एका मुंबई शहराचे दोन राज्ये आणि एक देश असे संयुक्त मुंबई होईल. जिथे मुंबईकर ती मुंबई.

<<< त्यामुळे यंदा काळजी घेत तीस वर्षे आधीच हा धागा काढत आहे. >>>

मुंबई सोडण्याची उत्तम वेळ ३० वर्षांपूर्वीच होती. दुसरी उत्तम वेळ आत्ता सध्याची आहे, अजून ३० वर्षे वाट बघायची गरज नाही.
Should you find yourself in a chronically leaking boat, energy devoted to changing vessels is likely to be more productive than energy devoted to patching leaks.

>>शक्य झाल्यास आता तरी राजकीय हेवेदावे विसरून मुंबईला, महाराष्ट्राच्या अस्मितेला, या देशाच्या आर्थिक राजधानीला वाचवायला पुढाकार घ्या.<<
सरकारला फतवा काढायला सांग - तळमजल्यावर, बैठ्या घरांत रहाणार्‍यांनी मुंबई सोडावी किंवा उंच इमारतीत रहायला जावं. मुंबई पाण्यात बुडाली कि तीचं शांघाय होण्याऐवजी व्हेनिस होईल. रस्त्यावरच्या खड्ड्यांचा प्रश्न हि निकालात निघेल. तु पण एक जेटस्की विकत घे; भाऊच्या धक्क्यावरुन वळण घेउन नविन मुंबईत २० मिनिटात पोचशील...

लवकर नाही का बुडू शकणार? >> वर्षा हिल वर आहे... रिमेंबर Wink

व्हेनिस Proud आणि बोरिवली चे काय बोराबोरा का? Lol

मुंबई बुडणार म्हणून महानगरपालिका दर वर्षी लोकांकडून पाण्यात बुडल्यावर काय करायचा याची प्रॅक्टिस करून घेते. ह्याला म्हणतात दूरदृष्टी!

म्हणजे पुढल्या ३० वर्षात शिवसेनेचं करियर पण संपलं म्हणा की. तरीच यावेळी बाळराजांच्या राज्याभिषेकाची इतकी घाई लागून राहिली.

पाफा, हो
मुंबईत तीन आहेत वाडवडिलांची
आणि आता स्वत: लोन काढून नवी मुंबईत चौथे घेतोय.
थोडक्यात ते ही डुबणारच तीस वर्षांनी

असो
प्रश्न फक्त मुंबईकरांचा नाही. मुण्बईला काही झाले तर महाराष्ट्राचे देशाचे काय होईल?
आजवर मुंबई सर्वांना सामावत आलीय. पण आता मुंबईकरांनाच कोण सामावून घेणार?
त्यात कोकण किनारपट्टीलाही धोका वर्तवला आहे. म्हणजे कोकणी मुंबईकरांचे तर गावही उरणार नाही.

मुंबई सोडण्याची उत्तम वेळ ३० वर्षांपूर्वीच होती. दुसरी उत्तम वेळ आत्ता सध्याची आहे,
>>>>
ओके. म्हणजे जे मुंबईत पूर्वापार राहत आले आहेत त्यांनीच मुंबई सोडायची.
दुर्दैवाने तेच चालू आहे गेले काही वर्षे...
आताही बाहेरून आलेल्यांना सामावाय्लाच आरे तोडले जात आहे.

एक ईंग्लिश म्हण आहे. जहाज बुडायला लागले की पहिला ऊंदरे पळतात..मला त्यातले एक बनून कुठे पळायचे हा विचार नाही करायचाय.. बुडणारे जहाज कसे वाचवता येईल हेच आधी बघणार

जहाज बुडायला लागले की पहिला ऊंदरे पळतात..मला त्यातले एक बनून कुठे पळायचे हा विचार नाही करायचाय.. बुडणारे जहाज कसे वाचवता येईल हेच आधी बघणार....+111111111

काही वेळा एकदम मस्त लिहतोस रे....

लवकर नाही का बुडू शकणार?

नवीन Submitted by भरत. on 1 November, 2019 - 22:12 >>

नैराश्याचा झटका आलाय की काय भावा तुला?

तो फक्त एक परिणाम आहे हवामान बदलाचा.
त्याच्या व्यतिरिक्त असंख्य बदल हवामानात होतील.
पावूस अनियमित पडेल.
तापमान वाढेल त्या मुळे असंख्य नवीन रोगांच्या साथी येतील.
अन्न धान्य चा प्रश्न बिकट होईल.
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होईल.
त्या बरोबर बेरोजगारी, गरिबी,हे नेहमीचे खेळाडू अजुन मजबुत होतील.
मुंबई सोडून पळणार कुठे .
सर्व ठिकाणी काही ना काही अडचण असणारच

<<< बुडणारे जहाज कसे वाचवता येईल हेच आधी बघणार >>>

मुंबई ही दलदल आहे, तिच्या प्रेमात पडलात तर त्यातून सुटका नाही.
पूर्वी लिहिले होते तेच आता पुन्हा लिहितो. (हा निसर्गाचा नियम आहे.)
It is not the most intellectual of the species that survives; it is not the strongest that survives; but the species that survives is the one that is able best to adapt and adjust to the changing environment in which it finds itself.

पृथ्वी वर परिवर्तन होतच राहणार.
आता पर्यंत असे काही वेळा घडले आहे.
किती तरी प्राणी नष्ट होवून नवीन प्राणी अस्तित्वात आले आहेत .
जंगल च्या जंगल पृथ्वी च्या पोटात गडप झालेली आहेत.
तसे आता सुधा होवू शकत.
पूर्ण जीव सृष्टीची पुनर्रचना होणे आवश्यक पण आहे .
खूप दिवस झाले आता पुनर्रचना होणे गरजेचं
आहे

तेच म्हणतोय मी. मराठीच्या पाठ्यपुस्तकात एक कविता होती. प्रलय नावाची.

असा प्रलय व्हावा
ज मीनदोस्त व्हावीत
घरे आणि शहरे
पुन्हा निर्माण व्हावीत
एका आकाराची,
एका विचाराची
आणि एकाच उंचीची
भेदाभेदरहित

असा प्रलय व्हावा
सार्‍या नद्यांचे प्रवाह बदलावेत
खुरटी झुडपे आकाशाला भिडावीत
सारा निसर्गच बदलावा
माणसाला बदलण्यासाठी
आणि माणसाला किंमत यावी माणूस म्हणून.

रोहिदास पोटे.

काहींनी याचं इंटरप्रिटेशन माणुसकीचा प्रलय , क्रांती असा केलाय. मला लागलेला अर्थ - माणसाच्याने हे होणे नाही, तेव्हा निसर्गानेच सगळ्यांना एकसपाट करून टाकावं.

फक्त एकच करावे निसर्गाने.
एका क्षणात उल्का पात वैगेरे घडवून सर्व नष्ट करावे.
तडपवून जीव सृष्टी नष्ट करू नये.
जसे daynosar नष्ट केले tas.
माणसाच्या हातून काही ही होणार नाही .
फक्त इशारे दिले जातील.
पण उपाय योजना करणे माणसाच्या आवक्या बाहेरचं आहे .
कार्बन विसर्जन थांबवावे तर बेरोजगारी आणि भुखमारी.
नाही थांबवावे तर वातावरणात अनिष्ट बदल .
काय करणार सापळ्यात अडकल्या सारखे झाले आहे.
फक्त मुंबई किंवा किनाऱ्या लगतचीच शहर नष्ट होतील असे नाही .
ही सर्व शहर आर्थिक केंद्र आहेत.
किती लोक त्या वर लोकांचे पोट अवलंबून आहे .
स्टीफन हॉकिंग सांगून गेलेत नवीन ग्रह शोधा.
पृथ्वी जास्त दिवस सजीवसृष्टी चे पालन पोषण करू शकणार नाही.
नवीन ग्रह शोधून तिथे पहिल्या पासून परत सर्व निर्माण करणे खूप कठीण काम आहे

आता २०५० साली मुंबईत कुठल्यातरी मोठ्या लाडक्या व्यक्तीचं निधन होईल आणि मग व्हाट्सअप फेसबुकवर मेसेज फिरतील. अश्रू अनावर झालेत, खरंच आज मुंबई पाण्याखाली गेली वैगरे वैगरे

संपुर्ण पृथ्वी नाही का बुडणार? Sad

नवीन Submitted by सस्मित on 2 November, 2019 - 09:51

नैराश्याचा झटका आलाय की काय बहिणी तुला?

असा प्रश्न यायची वाट बघत होतो Wink

हर्पेन Lol
बादवे, कुणाकडुन यायची शक्यता होती असा प्रश्न?

लवकर नाही का बुडू शकणार?

नवीन Submitted by भरत. on 1 November, 2019 - 22:12 >>

नैराश्याचा झटका आलाय की काय भावा तुला?

Submitted by मी-माझा on 2 November, 2019 - 09:10

हे वाचून, मी-माझा यांच्याकडून

हर्पेन, ते माझ्यासाठी एक्स्क्लुझिव आहेत.
एक मुलगा बास्केटबॉल खेळायला गेला. नवा खेळाडू म्हणून कप्तानाने त्याला विरोधी टीममधल्या एका खेळाडूच्या मागे मागे लागायचीआणि मधेमधे करायची ड्युटी दिली.
थोड्या वेळाने बघतो तर तो नवखा खेळाडू 'त्या' विरुद्ध खेळाडूच्या मागे मागे जाऊन बेंचवर बसलेला. Wink

ओके Happy

पूर्ण जीव सृष्टीची पुनर्रचना होणे आवश्यक पण आहे .
खूप दिवस झाले आता पुनर्रचना होणे गरजेचं
आहे
>>>

का गरजेचे आहे? काही शास्त्रीय कारण आहे की बस्स भावनेच्या भरात लिहिलेले वाक्य आहे? वाद नाही घालत तर काही शास्त्रीय कारण खरेच असेल तर माहीती जाणून घ्यायला आवडेल.

Pages